मत्तय 11:28-30
मत्तय 11:28-30 MARVBSI
अहो कष्टी व भाराक्रांत जनहो, तुम्ही सर्व माझ्याकडे या म्हणजे मी तुम्हांला विसावा देईन. मी जो मनाचा सौम्य व लीन आहे त्या माझे जू आपणांवर घ्या व माझ्यापासून शिका म्हणजे ‘तुमच्या जिवांना विसावा मिळेल.’ कारण माझे जू सोयीचे व माझे ओझे हलके आहे.”