यहोशवा 20
20
नेमलेली शरणपुरे
(गण. 35:6-34; अनु. 4:41-43; 19:1-13)
1मग परमेश्वर यहोशवाला म्हणाला, 2“इस्राएल लोकांना सांग, मी मोशेच्या द्वारे तुम्हांला सांगितले होते की, तुमच्याकरता शरणपुरे नेमा,
3म्हणजे तुमच्यापैकी कोणी चुकून वा नकळत कोणाला जिवे मारले तर त्याला तेथे पळून जाता येईल व रक्तपाताचा सूड उगवणार्यापासून स्वतःचा बचाव करता येईल.
4असा मनुष्य अशा एखाद्या नगरात पळून आला तर त्याने नगराच्या वेशीजवळ उभे राहावे आणि तेथील वडील मंडळीस आपली हकिकत सांगावी; मग त्यांनी त्याला आपल्या नगरात घेऊन आपल्यामध्ये राहायला जागा द्यावी.
5रक्तपाताचा सूड उगवणार्याने त्याचा पाठलाग केला तर त्यांनी त्या मनुष्यवध करणार्याला त्याच्या हाती देऊ नये; कारण त्याने नकळत आपल्या शेजार्याचा वध केला आहे; त्याचे त्याच्याशी पूर्वीचे वैर नव्हते.
6मंडळीसमोर त्याचा न्याय होईपर्यंत अथवा त्या वेळचा मुख्य याजक जिवंत असेपर्यंत त्याने त्या नगरात राहावे; मग पाहिजे तर ज्या गावाहून तो पळाला होता तेथे त्याने परत जाऊन आपल्या घरी राहावे.”
7ह्यावरून त्यांनी नफतालीच्या डोंगराळ प्रदेशातील गालीलातले केदेश, एफ्राइमाच्या डोंगराळ प्रदेशातले शखेम आणि यहूदाच्या डोंगराळ प्रदेशातले किर्याथ-आर्बा उर्फ हेब्रोन ही नगरे नेमली.
8यरीहोच्या पूर्वेस यार्देनेपलीकडे त्यांनी रऊबेन वंशाच्या विभागापैकी पठारावरल्या रानातले बेसेर, गाद वंशाच्या विभागांपैकी गिलादातील रामोथ आणि मनश्शे वंशाच्या विभागापैकी बाशानातले गोलान ही नगरे नेमली.
9सर्व इस्राएल लोकांसाठी व त्यांच्यामध्ये वस्ती करणार्या उपर्या लोकांसाठी ही नगरे नेमलेली होती. कोणी एखाद्यास नकळत जिवे मारले व तो अशा एखाद्या नगरात पळून गेला, तर त्याला तेथील मंडळीसमोर उभे केल्याशिवाय रक्तपाताचा सूड घेणार्याकडून त्याची हत्या होऊ नये.
Currently Selected:
यहोशवा 20: MARVBSI
Highlight
Share
Copy
Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र
Copyright © 2015 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.