योहान 1:1-11
योहान 1:1-11 MARVBSI
प्रारंभी शब्द होता, शब्द देवासह होता आणि शब्द देव होता. तोच प्रारंभी देवासह होता. सर्वकाही त्याच्या द्वारे झाले1 आणि जे काही झाले ते त्याच्यावाचून झाले नाही. त्याच्या ठायी जीवन होते, व ते जीवन मनुष्यमात्राचा प्रकाश होते. तो प्रकाश अंधारात प्रकाशतो; तरी अंधाराने त्याला ग्रासले नाही. देवाने पाठवलेला एक मनुष्य प्रकट झाला; त्याचे नाव योहान. तो साक्षीकरता म्हणजे त्या प्रकाशाविषयी साक्ष देण्याकरता आला; ह्यासाठी की, त्याच्या द्वारे सर्वांनी विश्वास ठेवावा. हा तो प्रकाश नव्हता, तर त्या प्रकाशाविषयी साक्ष देण्याकरता आला. जो खरा प्रकाश प्रत्येक मनुष्याला प्रकाशित करतो तो जगात येणार होता. तो जगात होता व जग त्याच्या द्वारे झाले, तरी जगाने त्याला ओळखले नाही. जे त्याचे स्वतःचे2 त्याकडे तो आला तरी त्याच्या स्वकीयांनी त्याचा स्वीकार केला नाही.