YouVersion Logo
Search Icon

यिर्मया 47

47
पलिष्ट्यांविषयी भविष्य
1फारोने गज्जावर मारा केला त्यापूर्वी पलिष्ट्यांविषयी परमेश्वराचे वचन यिर्मयाला प्राप्त झाले ते हे :
2“परमेश्वर म्हणतो, पाहा, उत्तरेकडून पाणी चढत आहे, त्याचा मोठा लोंढा बनत आहे; देश व त्यातील सर्वकाही, नगर व त्यातले रहिवासी ह्या सर्वांना तो तुडवील; लोक आक्रोश करतील, देशातले सर्व रहिवासी हायहाय करतील.
3त्याच्या घोड्यांच्या खुरांच्या टापामुळे, त्याच्या रथांच्या नादामुळे व त्याच्या चाकांच्या घडघडाटाने वडिलांचे हात गळाल्यामुळे ते मागे वळून आपल्या मुलांकडेसुद्धा पाहायचे नाहीत.
4पलिष्ट्यांच्या नाशाचा दिवस येत आहे; सोर व सीदोन ह्यांना साहाय्य करणारा जो कोणी उरला असेल त्याचा उच्छेद होईल; परमेश्वर पलिष्ट्यांचा म्हणजे कफतोर द्वीपांतील अवशिष्ट लोकांचा नाश करणार आहे.
5गज्जाचे वपन झाले आहे; त्यांच्या खोर्‍यांतले उरलेले अष्कलोन नष्ट झाले आहे; तू कोठवर आपणास जखमा करून घेशील?
6हे परमेश्वराच्या तलवारी, तू केव्हा स्वस्थ राहणार? तू परत आपल्या म्यानात जा. विराम पाव व स्वस्थ राहा!
7परमेश्वराने तिला आज्ञा केली आहे; तर ती कशी स्वस्थ राहील? अष्कलोन व समुद्रकिनारा ह्यांवर तिला त्याने नेमले आहे.”

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in

Video for यिर्मया 47