यशया 20
20
अश्शूर देश मिसर व कूश देश जिंकून घेईल
1अश्शूर देशाचा राजा सर्गोन ह्याने पाठवल्यावरून तर्तान अश्दोद येथे आला, व त्याने अश्दोदाशी लढून ते हस्तगत केले.
2त्या वेळी आमोजाचा पुत्र यशया ह्याच्या द्वारे परमेश्वर म्हणाला : “जा, आपल्या कंबरेचे गोणपाट सोडून टाक, आपल्या पायातला जोडा काढ.” त्याने तसे केले; तो उघडा व अनवाणी चालला.
3तेव्हा परमेश्वर म्हणाला, “तीन वर्षेपर्यंत मिसर व कूश ह्यांना चिन्ह व विस्मय व्हावा म्हणून माझा सेवक यशया उघडा व अनवाणी चालला;
4तसा अश्शूर देशाचा राजा मिसरातील बंदिवान व कूशाचे हद्दपार केलेले तरुण व म्हातारे ह्यांना उघडे, अनवाणी व उघड्या कुल्ल्यांनी, मिसर देश फजीत व्हावा म्हणून घेऊन जाईल.
5ज्या कूशाची त्यांनी अपेक्षा केली व ज्या मिसर देशाची त्यांना घमेंड वाटली त्याच्यामुळे ते घाबरे व लज्जित होतील.
6त्या दिवशी ह्या समुद्रतीरीचे रहिवासी म्हणतील, ‘पाहा, अश्शूरच्या राजापासून आम्हांला सोडवावे म्हणून आम्ही ज्याची अपेक्षा केली, ज्याच्याकडे आम्ही साहाय्यार्थ धावलो त्याची अशी गत झाली; मग आमचा निभाव कसा लागेल?”’
Currently Selected:
यशया 20: MARVBSI
Highlight
Share
Copy
Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र
Copyright © 2015 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.