YouVersion Logo
Search Icon

होशेय 6

6
1“चला, आपण परमेश्वराकडे परत जाऊ; कारण त्याने आम्हांला फाडले आहे, व तोच आम्हांला बरे करील; त्याने आम्हांला जखम केली आहे व तोच पट्टी बांधील.
2तो दोन दिवसांत आमचे पुनरुज्जीवन करील; तिसर्‍या दिवशी तो आम्हांला उठवून उभे करील; आणि त्याच्यासमोर आम्ही जिवंत राहू.
3चला, आपण परमेश्वरास ओळखू; परमेश्वराचे ज्ञान मिळवण्यास झटू; त्याचा उदय अरुणोदयाप्रमाणे निश्‍चित आहे; तो पर्जन्याप्रमाणे भूमी शिंपणार्‍या वळवाच्या पर्जन्याप्रमाणे आमच्याकडे येईल.”
4हे एफ्राइमा, मी तुला काय करू? हे यहूदा, मी तुला काय करू? तुमचे चांगुलपण सकाळच्या अभ्राप्रमाणे, लवकर उडून जाणार्‍या दहिवराप्रमाणे आहे.
5म्हणून मी त्यांच्यावर संदेष्ट्याच्या हातून कुर्‍हाड चालवली आहे, माझ्या तोंडच्या शब्दांनी त्यांना ठार केले आहे; माझा न्याय प्रकाशाप्रमाणे व्यक्त झाला आहे.
6मी यज्ञाचा नाही तर दयेचा भुकेला आहे; होमार्पणांपेक्षा देवाचे ज्ञान मला आवडते.
7त्यांनी मनुष्याप्रमाणे1 करार मोडला आहे; तेथे ते माझ्याबरोबर बेइमानपणे वागले आहेत.
8गिलाद हे दुष्कर्म्यांचे शहर आहे, त्यावर रक्ताची पावले उमटली आहेत.
9मनुष्यांवर टपणार्‍या लुटारूंच्या टोळ्यांसारखी याजकांची टोळी आहे, ते शखेमाच्या वाटेवर खून करतात; त्यांनी महापाप केले आहे.
10इस्राएलाच्या घराण्यात मी घोर प्रकार पाहिला आहे, एफ्राइमात जारकर्म चालू आहे; इस्राएल भ्रष्ट झाला आहे.
11हे यहूदा, मी आपल्या लोकांचा बंदिवास उलटवीन तेव्हा तुझ्याही हंगामाची वेळ येईल.

Currently Selected:

होशेय 6: MARVBSI

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in