YouVersion Logo
Search Icon

निर्गम 14:13-18

निर्गम 14:13-18 MARVBSI

मोशे लोकांना म्हणाला, “भिऊ नका. स्थिर उभे राहा आणि परमेश्वर आज तुमचे जे तारण करील ते पाहा, कारण ज्या मिसरी लोकांना तुम्ही आज पाहत आहात ते पुन्हा कधीही तुमच्या नजरेस पडणार नाहीत. परमेश्वर तुमच्यासाठी लढेल; तुम्ही शांत राहा.” मग परमेश्वर मोशेला म्हणाला, “माझा धावा करीत काय बसलास? इस्राएल लोकांना सांग की, पुढे चला. तू आपली काठी उचलून आपला हात समुद्रावर उगार व त्याचे दोन भाग कर म्हणजे इस्राएल लोक भर समुद्रातून कोरड्या भूमीवर चालतील; आणि पाहा, मी स्वतः मिसर्‍यांची मने कठीण करीन. ते त्यांच्या पाठीस लागतील; आणि फारो, त्याची सर्व सेना, त्याचे रथ व त्याचे स्वार ह्यांच्याकडून मी आपला सन्मान पावेन. फारो, त्याचे रथ व त्याचे स्वार ह्यांच्या (पराभवा) कडून माझे गौरव झाल्याने मी परमेश्वर आहे हे मिसरी लोक ओळखतील.”