इफिसकरांस पत्र 6:1-4
इफिसकरांस पत्र 6:1-4 MARVBSI
मुलांनो, प्रभूमध्ये तुम्ही आपल्या आईबापांच्या आज्ञेत राहा, कारण हे योग्य आहे. “आपला बाप व आपली आई ह्यांचा मान राख, ह्यासाठी की, तुझे कल्याण व्हावे व तू पृथ्वीवर दीर्घायू असावे.” (अभिवचन असलेली हीच पहिली आज्ञा आहे). बापांनो, तुम्ही आपल्या मुलांना चिडीस आणू नका; तर प्रभूच्या शिस्तीत व शिक्षणात त्यांना वाढवा.