YouVersion Logo
Search Icon

अनुवाद 13:1-3

अनुवाद 13:1-3 MARVBSI

तुमच्यामध्ये एखादा संदेष्टा अथवा स्वप्न पाहणारा प्रकट झाला व त्याने तुम्हांला काही चिन्ह अथवा चमत्कार दाखवला, आणि त्या चिन्हाचा किंवा त्या चमत्काराचा तुम्हांला प्रत्यय आला, आणि तुम्हांला अपरिचित अशा अन्य देवांना अनुसरून त्यांची सेवा करण्याचे त्याने तुम्हांला सुचवले, तरी त्या संदेष्ट्याचे किंवा त्या स्वप्न पाहणार्‍याचे तुम्ही ऐकू नका; कारण तुम्ही आपला देव परमेश्वर ह्याच्यावर संपूर्ण मनाने व संपूर्ण जिवाने प्रीती करता की नाही हे पाहण्यासाठी तुमचा देव परमेश्वर तुमची ही अशी परीक्षा पाहत आहे.