कलस्सै 4:2-6
कलस्सै 4:2-6 MARVBSI
प्रार्थनेत तत्पर असा व तिच्यात उपकारस्तुती करत जागृत राहा; आणखी आमच्यासाठीही प्रार्थना करा, अशी की, ख्रिस्ताच्या ज्या रहस्यामुळे मी बंधनातही आहे ते सांगण्यास देवाने आमच्यासाठी वचनाकरता दार उघडावे; ह्यासाठी की, जसे मला बोलले पाहिजे तसे बोलून मी ते रहस्य प्रकट करावे. बाहेरच्या लोकांबरोबर सुज्ञतेने वागा; संधी साधून घ्या. तुमचे बोलणे सर्वदा कृपायुक्त, मिठाने रुचकर केल्यासारखे असावे, म्हणजे प्रत्येकाला कसकसे उत्तर द्यायचे हे तुम्ही समजावे.