YouVersion Logo
Search Icon

२ करिंथ 4:7-12

२ करिंथ 4:7-12 MARVBSI

ही आमची संपत्ती मातीच्या भांड्यात आहे, अशा हेतूने की, सामर्थ्याची पराकोटी देवाची आहे, आमच्यापासून होत नाही, हे समजावे. आमच्यावर चोहोंकडून संकटे आली तरी आमचा कोंडमारा झाला नाही; आम्ही घोटाळ्यात पडलो तरी निराश झालो नाही; आमचा पाठलाग झाला तरी परित्याग करण्यात आला नाही; आम्ही खाली पडलेले आहोत तरी आमचा नाश झाला नाही; आम्ही प्रभू येशूचा वध सर्वदा शरीरात वागवतो, अशा हेतूने की, येशूचे जीवनही आमच्या शरीरांत प्रकट व्हावे. कारण जे आम्ही जिवंत राहतो ते आम्ही येशूप्रीत्यर्थ सदाचेच मरणाच्या हाती सोपवलेले आहोत, ह्यासाठी की, येशूचे जीवनही आमच्या मर्त्य देहात प्रकट व्हावे. आमच्यामध्ये मरण, पण तुमच्यामध्ये जीवन आपले कार्य चालवते.