YouVersion Logo
Search Icon

२ करिंथ 4:7-10

२ करिंथ 4:7-10 MARVBSI

ही आमची संपत्ती मातीच्या भांड्यात आहे, अशा हेतूने की, सामर्थ्याची पराकोटी देवाची आहे, आमच्यापासून होत नाही, हे समजावे. आमच्यावर चोहोंकडून संकटे आली तरी आमचा कोंडमारा झाला नाही; आम्ही घोटाळ्यात पडलो तरी निराश झालो नाही; आमचा पाठलाग झाला तरी परित्याग करण्यात आला नाही; आम्ही खाली पडलेले आहोत तरी आमचा नाश झाला नाही; आम्ही प्रभू येशूचा वध सर्वदा शरीरात वागवतो, अशा हेतूने की, येशूचे जीवनही आमच्या शरीरांत प्रकट व्हावे.