1 थेस्सल 5:14-22
1 थेस्सल 5:14-22 MARVBSI
बंधूंनो, आम्ही तुम्हांला बोध करतो की, अव्यवस्थित लोकांना ताकीद द्या, जे अल्पधीराचे आहेत त्यांना धीर द्या. अशक्तांना आधार द्या, सर्वांबरोबर सहनशीलतेने वागा. कोणी कोणाचे वाइटाबद्दल वाईट करू नये म्हणून जपून राहा आणि सर्वदा एकमेकांचे व सर्वांचे चांगले करत राहा. सर्वदा आनंदित असा; निरंतर प्रार्थना करा; सर्व स्थितीत उपकारस्तुती करा; कारण तुमच्याविषयी ख्रिस्त येशूमध्ये देवाची इच्छा हीच आहे. आत्म्याला विझवू नका; संदेशांचा धिक्कार करू नका; सर्व गोष्टींची पारख करा; चांगले ते बळकट धरा; वाइटाच्या प्रत्येक प्रकारापासून दूर राहा.