YouVersion Logo
Search Icon

१ शमुवेल 16:7-12

१ शमुवेल 16:7-12 MARVBSI

पण परमेश्वराने शमुवेलास म्हटले, “तू त्याच्या स्वरूपावर अथवा त्याच्या शरीराच्या उंच काठीवर जाऊ नकोस, कारण मी त्याला नापसंत केले आहे; मानवासारखे परमेश्वराचे पाहणे नसते; मानव बाहेरचे स्वरूप पाहतो पण परमेश्वर हृदय पाहतो.” मग इशायाने अबीनादाबास बोलावून शमुवेलापुढून चालवले; पण शमुवेल म्हणाला, “परमेश्वराला हाही पसंत नाही.” मग इशायाने शाम्मा ह्याला त्याच्यापुढून चालवले; पण शमुवेल म्हणाला, “परमेश्वराला हाही पसंत नाही.” ह्या प्रकारे इशायाने आपले सात पुत्र शमुवेलापुढून चालवले. शमुवेलाने इशायाला म्हटले, “ह्यांतला कोणीही परमेश्वराने पसंत केला नाही. शमुवेलाने इशायाला विचारले, “तुझे सर्व पुत्र हजर आहेत काय?” तो म्हणाला, “एक सर्वांत धाकटा राहिला आहे; पण पाहा, तो शेरडेमेंढरे राखत आहे.” तेव्हा शमुवेल इशायाला म्हणाला, “त्याला बोलावणे पाठवून आण, तो येईपर्यंत आम्ही भोजनास बसणार नाही.” त्याने बोलावणे पाठवून त्याला आणले. त्याचा वर्ण तांबूस, डोळे सुंदर व रूप मनोहर होते. तेव्हा परमेश्वराने त्याला म्हटले, “ऊठ, त्याला अभिषेक कर, हाच तो आहे.”