१ इतिहास 8
8
बन्यामिनाचे वंशज
1बन्यामिनाला ज्येष्ठ पुत्र बेला, दुसरा आश्बेल, तिसरा अहरह, 2चौथा नोहाह व पाचवा राफा हे झाले.
3बेलाचे पुत्र : अद्दार, गेरा, अबीहूद, 4अबीशूवा, नामान, अहोह, 5गेरा, शफूफान व हूराम.
6एहूदाचे पुत्र गेबा येथल्या पितृकुळांचे प्रमुख होते; त्यांना पाडाव करून मानाहथ येथे नेले;
7नामान, अहीया व गेरा ह्यांना त्याने कैद करून नेले; त्याला उज्जा व अहीहूद हे झाले.
8त्यांना घालवून दिल्यावर मवाबाच्या पठारात शहरयिमास संतती झाली; त्याच्या बायका हुशीम व बारा ह्या होत्या.
9त्याची बायको होदेश; हिच्या पोटी त्याला योबाब, सिब्या, मेशा, मल्काम,
10यऊस, शख्या व मिर्मा हे झाले. हे त्याचे पुत्र त्यांच्या पितृकुळांतले प्रमुख होत.
11हुशीमेपासून त्याला अबीटूब व एल्पाल झाले.
12एल्पालाचे पुत्र : एबर, मिशाम व शमेद; शमेदाने ओनो व लोद आणि त्यांची खेडीपाडी वसवली.
13बरीया व शमा हे अयालोनकरांच्या पितृकुळातील प्रमुख पुरुष होते व त्यांनी गथकरांना पळवून लावले;
14अह्यो, शाशक, यरेमोथ,
15जबद्या, अराद, एदर,
16मीखाएल, इश्पा व योहा, हे बरीयाचे पुत्र;
17जबद्या, मशुल्लाम, हिज्की, हेबेर;
18इश्मरय, इज्लीया व योबाब हे एल्पालाचे पुत्र;
19याकीम, जिख्री, जब्दी,
20एलीएनय, सिलथय, अलीएल,
21अदाया, बराया व शिम्राथ हे शिमीचे पुत्र;
22इश्पान, एबर, अलीएल;
23अब्दोन, जिख्री, हानान,
24हनन्या, एलाम, अनथोथीया,
25इफदया व पनुएल हे शाशकाचे पुत्र;
26शम्शरय, शहर्या, अथल्या,
27यारेश्या, एलीया व जिख्री हे यरोहामाचे पुत्र;
28हे आपापल्या पिढीत आपापल्या पितृकुळांतले प्रमुख पुरुष असून यरुशलेम येथे राहत असत.
शौलाची वंशावळ
(१ इति. 9:35-44)
29गिबोनात गिबोनाचा बाप राहत होता, त्याच्या बायकोचे नाव माका;
30त्याचे पुत्र : ज्येष्ठ अब्दोन, सूर, कीश, बाल, नादाब,
31गदोर, अह्यो व जेखर,
32आणि मिकलोथास शिमा झाला. हे आपल्या भाऊबंदांसमोर त्यांच्याबरोबर यरुशलेम येथे वस्ती करून होते.
33नेराला कीश झाला; कीशास शौल झाला. शौलास योनाथान, मलकीशुवा, अबीनादाब व एश्बाल हे होते.
34योनाथानाचा पुत्र मरीब्बाल; मरीब्बाल ह्याला मीखा झाला.
35मीखाचे पुत्र : पीथोन, मेलेख, तरेया व आहाज.
36आहाजास यहोअद्दा झाला; यहोआद्दास आलेमेथ, अजवामेथ व जिम्री हे झाले; जिम्रीस मोसा झाला.
37मोसाला बिना झाला; त्याचा पुत्र राफा, त्याचा पुत्र एलासा व त्याचा पुत्र आसेल;
38आसेलास सहा पुत्र होते, त्यांची नावे ही : अज्रीकाम, बोखरू, इश्माएल, शार्या, ओबद्या व हान; हे सर्व आसेलाचे पुत्र.
39त्याचा भाऊ एशेक ह्याचे पुत्र : ज्येष्ठ ऊलाम, दुसरा यऊष व तिसरा अलीफलेत.
40ऊलामाचे वंशज शूर वीर असून धनुर्धारी होते; त्यांचे पुत्रपौत्र मिळून दीडशे होते. हे सर्व बन्यामिनाच्या वंशातले होते.
Currently Selected:
१ इतिहास 8: MARVBSI
Highlight
Share
Copy
Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र
Copyright © 2015 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.