१ इतिहास 27
27
राज्यातील अंमलदार
1इस्राएल लोकांची गणती म्हणजे पितृकुळांतील मुख्य पुरुष, सहस्रपती, शतपती व त्यांचे सरदार ह्यांची आणि जे वर्षभर प्रतिमासी कामावर हजर होते, सुटी मिळाली म्हणजे जात व अशा प्रकारे राजाची सेवाचाकरी करीत त्यांची प्रत्येक वर्गाप्रमाणे गणती चोवीस हजार होती.
2पहिल्या महिन्याच्या पहिल्या वर्गावर जब्दीएलाचा पुत्र याशबाम होता; त्याच्या वर्गात चोवीस हजार होते.
3तो पेरेसाच्या वंशातला होता व पहिल्या महिन्यात सैन्याच्या सर्व सरदारांचा मुख्य असे.
4दुसर्या महिन्याच्या वर्गावर दोदय अहोही हा आणि त्याचा वर्ग असे; मिक्लोथ हा त्यांचा नायक होता; त्याच्या वर्गात चोवीस हजार होते.
5तिसर्या महिन्याचा तिसरा सेनापती यहोयादा ह्याचा पुत्र बनाया, हा मुख्य याजक होता; त्याच्या वर्गात चोवीस हजार होते, 6तिसांमध्ये शूर व तिसांमध्ये वरिष्ठ असा जो होता तोच हा बनाया; त्याचा पुत्र अम्मीजाबाद हाही त्याच्याच वर्गात होता.
7चौथ्या महिन्याचा चवथा सरदार यवाबाचा भाऊ असाएल हा होता; त्याच्यामागून त्याचा पुत्र जबद्या हा होता; त्याच्या वर्गात चोवीस हजार होते.
8पाचव्या महिन्याचा पाचवा सरदार शम्हूथ इज्राही हा होता; त्याच्या वर्गात चोवीस हजार होते.
9सहाव्या महिन्याचा सहावा सरदार इक्केशाचा पुत्र ईरा तकोई हा होता; त्याच्या वर्गात चोवीस हजार होते.
10सातव्या महिन्याचा सातवा सरदार एफ्राइमाच्या वंशातला हेलस पलोनी हा होता; त्याच्या वर्गात चोवीस हजार होते.
11आठव्या महिन्याचा आठवा सरदार जेरह वंशातला सिब्बखय हूशाथी हा होता; त्याच्या वर्गात चोवीस हजार होते.
12नवव्या महिन्याचा नववा सरदार बन्यामिनी वंशातला अबियेजेर अनाथोथी हा होता; त्याच्या वर्गात चोवीस हजार होते.
13दहाव्या महिन्याचा दहावा सरदार जेरह वंशातला महरय नटोफाथी हा होता; त्याच्या वर्गात चोवीस हजार होते.
14अकराव्या महिन्याचा अकरावा सरदार एफ्राइमाच्या वंशातला बनाया पिराथोनी हा होता; त्याच्या वर्गात चोवीस हजार होते.
15बाराव्या महिन्याचा बारावा सरदार अथनिएल वंशातला हेल्दय नटोफाथी हा होता; त्याच्या वर्गात चोवीस हजार होते.
16आणखी इस्राएलाच्या वंशांवरील हे अधिकारी होते : रऊबेन वंशाचा अधिकारी जिख्रीचा पुत्र अलिएजर हा होता; शिमोन वंशाचा अधिकारी माकाचा पुत्र शफाट्या हा होता,
17लेवी वंशाचा अधिकारी कमुवेलाचा पुत्र हशब्या; अहरोन वंशाचा अधिकारी सादोक;
18यहूदा वंशाचा अधिकारी दाविदाच्या भाऊबंदातला अलीहू; इस्साखार वंशातला अधिकारी मीखाएलाचा पुत्र अम्री;
19जबुलून वंशाचा अधिकारी ओबद्याचा पुत्र इश्माया; नफताली वंशाचा अधिकारी अज्रिएलाचा पुत्र यरीमोथ;
20एफ्राईम वंशाचा अधिकारी अजर्याचा पुत्र होशेथ; मनश्शेच्या अर्ध्या वंशाचा अधिकारी पदायाचा पुत्र योएल;
21गिलादातल्या मनश्शेच्या अर्ध्या वंशाचा अधिकारी जखर्याचा पुत्र इद्दो; बन्यामीन वंशाचा अधिकारी अबनेराचा पुत्र यासीएल;
22दान वंशाचा अधिकारी यरोहामाचा पुत्र अजरेल; हे इस्राएलाच्या वंशाचे सरदार होते.
23तथापि दाविदाने वीस वर्षांचे व त्यांहून कमी वयाचे लोक ह्यांची गणती केली नाही. कारण इस्राएलाची संख्या आकाशातील तार्यांप्रमाणे वाढवीन असे परमेश्वराने म्हटले होते.
24सरूवेचा पुत्र यवाब हा गणती करू लागला, पण त्याने ते काम पूर्ण केले नाही; कारण त्यामुळे देवाचा कोप इस्राएलावर भडकला; ही गणती दावीद राजाच्या बखरीत लिहिलेली नाही.
25राजाच्या भांडारावर अदीएलाचा पुत्र अजमावेथ हा होता; आणि शेतातल्या, नगरातल्या, गावातल्या व किल्ल्यातल्या भांडारांवर उज्जीयाचा पुत्र योनाथान हा होता;
26जमिनीची लागवड करणार्या शेतकर्यांवर कलूबाचा पुत्र एज्री हा होता;
27द्राक्षाच्या मळ्यावर शीमी रामाथी हा होता; आणि द्राक्षाच्या मळ्यांच्या उत्पन्नावर व द्राक्षारसाच्या कोठ्यांवर जब्दी शिफमी हा होता;
28जैतून झाडांवर व सखल प्रदेशातील उंबराच्या झाडांवर बाल-हानान गदेरी हा होता; तेलाच्या कोठ्यांवर योवाश हा होता;
29जी गुरे शारोनात चरत असत त्यांवर शित्रय शारोनी हा होता; खोर्यातल्या गुरांवर अदलय ह्याचा पुत्र शाफाट हा होता;
30उंटांवर ओबील इश्माएली हा होता; गाढवांवर येहद्या मेरोनोथी हा होता;
31आणि मेंढरांवर याजीज हाग्री हा होता; हे दावीद राजाच्या धनावर अधिकारी होते.
32दाविदाचा चुलता योनाथान हा मंत्री असून मोठा समजूतदार व लेखक होता; हखमोन्याचा पुत्र यहीएल राजपुत्रांबरोबर असे;
33अहीथोफेल हा राजाचा मंत्री होता; आणि हूशय अर्की हा राजाचा मित्र होता.
34अहीथोफेलामागून बनायाचा पुत्र यहोयादा व अब्याथार हे मंत्री झाले; आणि राजाचा सेनापती यवाब हा होता.
Currently Selected:
१ इतिहास 27: MARVBSI
Highlight
Share
Copy
Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र
Copyright © 2015 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.