YouVersion Logo
Search Icon

१ इतिहास 20

20
दावीद राब्बा नगर घेतो
(२ शमु. 12:26-31)
1राजे लोक युद्धाच्या मोहिमेस जातात त्या समयी म्हणजे वर्षारंभी यवाबाने आपले सैन्यबळ घेऊन अम्मोनी लोकांचा मुलूख उद्ध्वस्त केला आणि मग येऊन राब्बा नगरास वेढा घातला; पण दावीद यरुशलेमातच राहिला. यवाबाने राब्बा नगरावर मारा करून ते उद्ध्वस्त केले.
2दाविदाने त्या लोकांच्या राजाच्या2 मस्तकांवरून मुकुट काढला; त्याचे वजन एक सोन्याचा किक्कार आहे असे त्याला कळून आले; तो रत्नजडित होता; तो दाविदाच्या मस्तकावर ठेवण्यात आला. त्याने त्या नगरातून पुष्कळ लूट आणली.
3त्याने त्या नगराच्या रहिवाशांना बाहेर काढून करवती, लोखंडी दाताळी व कुर्‍हाडी ह्यांनी कापले.3 अम्मोन्यांच्या सर्व नगरांचेही त्याने तसेच केले. मग दावीद सर्व लोकांसह यरुशलेमास परत आला.
दाविदाच्या योद्ध्यांनी ठार केलेले धिप्पाड पुरुष
(२ शमु. 21:18-22)
4ह्यानंतर पलिष्ट्यांशी गेजेर येथे पुन्हा युद्ध झाले; त्या प्रसंगी हूशाथी सिब्बखय ह्याने रेफाई वंशातला सिप्पय ह्याला जिवे मारले तेव्हा ते लोक शरण आले.
5पलिष्ट्यांशी पुन्हा युद्ध झाले तेव्हा याइराचा पुत्र एलहानान ह्याने गथकर गल्याथ ह्याचा भाऊ लहमी ह्याचा वध केला; गल्याथाच्या भावाची काठी साळ्याच्या तुरीएवढी होती.
6गथ येथे पुन्हा युद्ध झाले तेव्हा तेथे रेफाई वंशातला एक मोठा धिप्पाड पुरुष होता, त्याच्या प्रत्येक हातास व पायास सहा-सहा अशी एकंदर चोवीस बोटे होती.
7त्याने इस्राएलाची अवहेलना केल्यावरून दाविदाचा भाऊ शिमी ह्याचा पुत्र योनाथान ह्याने त्याचा वध केला.
8हे पुरुष गथ गावी रेफाईला झाले होते; ते दाविदाच्या व त्याच्या सेवकांच्या हाताने पडले.

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in

Video for १ इतिहास 20