YouVersion Logo
Search Icon

१ इतिहास 1

1
आदामाचे वंशज
(उत्प. 5:1-32)
1आदाम, शेथ, अनोश;
2केनान, महललेल, यारेद;
3हनोख, मथुशलह, लामेख;
4नोहा, शेम, हाम व याफेथ.
नोहाच्या मुलांचे वंशज
(उत्प. 10:1-32)
5याफेथाचे पुत्र : गोमर, मागोग, मादय, यावान, तुबाल, मेशेख व तीरास.
6गोमराचे पुत्र : आष्कनाज, दीफाथ व तोगार्मा.
7यावानाचे पुत्र : अलीशा, तार्शीश, कित्तीम व दोदानीम.
8हामाचे पुत्र : कूश, मिस्राईम, पूट व कनान.
9कूशाचे पुत्र : सबा, हवीला, साब्ता, रामा व साब्तका; आणि रामाचे पुत्र : शबा व ददान.
10कूशाला निम्रोद झाला; तो पृथ्वीवर महावीर निपजला.
11मिस्राईम ह्याला लूदीम, अनामीम, लहाबीम, नाप्तुहीम,
12पात्रुसीम, कास्लूहीम (ह्यांच्यापासून पलिष्टी झाले) व कफतोरीम हे झाले.
13कनानाला सीदोन (हा त्याचा ज्येष्ठ पुत्र) हेथ,
14यबूसी, अमोरी, गिर्गाशी,
15हिव्वी, अर्की, शीनी,
16अर्वादी, समारी व हमाथी हे झाले.
17शेमाचे पुत्र : एलाम, अश्शूर, अर्पक्षद, लूद, अराम, ऊस, हूल, गेतेर व मेशेख.
18अर्पक्षदाला शेलह झाला व शेलहाला एबर झाला.
19एबरास दोन पुत्र झाले : एकाचे नाव पेलेग होते, कारण त्याच्या दिवसांत पृथ्वीची वाटणी झाली; त्याच्या भावाचे नाव यक्तान होते.
20यक्तानास अलमोदाद, शेलेफ, हसर्मावेथ, येरह,
21हदोराम, ऊजाल, दिक्ला,
22एबाल, अबीमाएल, शबा,
23ओफीर, हवीला व योबाब असे पुत्र झाले; हे सगळे यक्तानाचे पुत्र.
शेमाचे वंशज
(उत्प. 11:10-26)
24शेम, अर्पक्षद, शेलह,
25एबर, पेलेग, रऊ,
26सरूग, नाहोर, तेरह,
27अब्राम (तोच अब्राहाम).
इश्माएलचे वंशज
(उत्प. 25:1-6,12-18)
28अब्राहामाचे पुत्र इसहाक व इश्माएल.
29त्यांच्या वंशावळी ह्या : इश्माएलाचा ज्येष्ठ पुत्र नबायोथ; त्याच्याखेरीज त्याचे पुत्र हे : केदार, अदबेल, मिबसाम,
30मिश्मा, दुमा, मस्सा, हदद, तेमा,
31यतूर, नापीश व केदमा; हे इश्माएलाचे पुत्र.
32अब्राहामाची उपपत्नी कटूरा हिचे पुत्र : तिला जिम्रान, यक्षान, मदान, मिद्यान, इश्बाक व शूह हे झाले; यक्षानाचे पुत्र : शबा व ददान.
33मिद्यानाचे पुत्र : एफा, एफर, हनोख, अबीदा व एल्दा. हा सगळा कटूरेचा वंश.
एसावाचे वंशज
(उत्प. 36:1-43)
34अब्राहामाला इसहाक झाला. इसहाकाचे पुत्र : एसाव व इस्राएल.
35एसावाचे पुत्र : अलीपाज, रगुवेल, यऊश, यालाम व कोरह.
36अलीपाजाचे पुत्र : तेमान, ओमार, सपी, गाताम, कनाज, तिम्ना व अमालेक.
37रगुवेलाचे पुत्र : नहाथ, जेरह, शाम्मा व मिज्जा.
38सेईराचे पुत्र : लोटान, शोबाल, सिबोन, अना, दीशोन, एसर व दीशान.
39लोटानाचे पुत्र : होरी व होमाम; लोटानाची बहीण तिम्ना.
40शोबालाचे पुत्र : आल्यान, मानहाथ, एबाल, शपी व ओनाम. सिबोनाचे पुत्र : अय्या व अना.
41अनाचा पुत्र : दीशोन. दीशोनाचे पुत्र : हम्रान, एश्बान, इथ्रान व करान.
42एसराचे पुत्र : बिल्हान, जाबान व याकान. दीशोनाचे पुत्र : ऊस व अरान.
43इस्राएल लोकांवर कोणी राजाने राज्य करण्यापूर्वी अदोम देशावर ज्या राजांनी राज्य केले ते हे : बौराचा पुत्र बेला; त्याची राजधानी दीन्हाबा हे नगर होते.
44बेला मेल्यावर बस्रा येथला जेरहाचा पुत्र योबाब त्याच्या गादीवर बसला.
45योबाब मेल्यावर तेमानींच्या देशाचा हूशाम त्याच्या गादीवर बसला.
46हूशाम मेल्यावर त्याच्या जागी बदादाचा पुत्र हदाद त्याच्या गादीवर बसला; ह्यानेच मवाब मैदानात मिद्यानाचा मोड केला; त्याची राजधानी अवीत शहर होते.
47हदाद मेल्यावर मास्रेका येथील साम्ला त्याच्या गादीवर बसला.
48साम्ला मेल्यावर फरात नदीतीरीच्या रहोबोथ नावाच्या नगरातला शौल त्याच्या गादीवर बसला.
49शौल मेल्यावर अकबोराचा पुत्र बालहानान त्याच्या गादीवर बसला.
50बालहानान मेल्यावर हदाद त्याच्या गादीवर बसला. त्याची राजधानी पाई होती; त्याच्या बायकोचे नाव महेटाबेल, ती मे-जाहाबाची कन्या जी मात्रेद तिची कन्या होती.
51हदाद मेल्यावर अदोमाचे सरदार झाले ते हे : सरदार तिम्ना, सरदार आल्या, सरदार यतेथ,
52सरदार अहलीबामा, सरदार एला, सरदार पिनोन,
53सरदार कनाज, सरदार तेमान, सरदार मिब्सार,
54सरदार माग्दीएल व सरदार ईराम. हे अदोमाचे सरदार होत.

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in