तव पवित्र आत्मा नि फिलिप्प ले सांग, “पुळे जाईसन ह्या रथ ना संगे-संगे चालू लाग.” फिलिप्प पयीसन रथ जोळे पोहोचना आणि त्या माणुस ले यशया भविष्यवक्ता नि पुस्तक वाचतांना आयक, तव तेनी तेले विचार, “तू जे वाची ऱ्हायंना काय तेले समजस बी?” खोजा नि उत्तर दिधा, “जर कोणी मले समजाळनारा नई शे त, मी येले नई समजसु सकस.” मंग तेनी फिलिप्प ले रथ वर चळीसन बठानी विनंती करी.