1
रोमकरांस 3:23-24
मराठी समकालीन आवृत्ती
कारण सर्वांनी पाप केले आहे, आणि परमेश्वराच्या गौरवाला अंतरले आहेत, आता परमेश्वराच्या कृपेने, ख्रिस्त येशूंच्याद्वारे खंडणी भरून आपल्याला मुक्त केले आणि विनामुल्य प्रकारे नीतिमान म्हणून जाहीर केले आहे.
Compare
Explore रोमकरांस 3:23-24
2
रोमकरांस 3:22
परमेश्वराचे नीतिमत्व येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवणार्यांना दिली आहे, त्यात यहूदी व गैरयहूदी असा भेद केलेला नाही
Explore रोमकरांस 3:22
3
रोमकरांस 3:25-26
ख्रिस्ताच्या सांडलेल्या रक्ताने विश्वासाद्वारे प्रायश्चिताचा यज्ञ व्हावा म्हणून परमेश्वराने त्यांना प्रस्तुत केले. यासाठी की मागे केलेल्या आपल्या पापांसाठी त्यांच्या सहनशीलतेमुळे दंड मिळू नये, तर त्यांचे नीतिमत्व प्रगट व्हावे. आता सध्याच्या काळात देखील ते आपले नीतिमत्व प्रकट करीत आहेत, यासाठी की त्यांनी स्वतःवर आणि येशूंवर विश्वास ठेवणार्यांना नीतिमान म्हणून घोषित करावे.
Explore रोमकरांस 3:25-26
4
रोमकरांस 3:20
नियमशास्त्राप्रमाणे कृती करणारी कोणीही व्यक्ती परमेश्वरासमोर नीतिमान म्हणून घोषित केली जाणार नाही; आपल्या पापांची जाणीव आपणाला नियमशास्त्रामुळे होते.
Explore रोमकरांस 3:20
5
रोमकरांस 3:10-12
असे लिहिले आहे: “कोणीही नीतिमान नाही, एकही नाही; समंजस असा कोणी नाही; परमेश्वराला शोधणारा कोणी नाही. प्रत्येकजण बहकला आहे; सारे जण निरुपयोगी झाले आहेत. योग्य करणारा कोणीच नाही, एकही नाही.”
Explore रोमकरांस 3:10-12
6
रोमकरांस 3:28
आमची मान्यता ही आहे की मनुष्य विश्वासाद्वारे नीतिमान ठरतो, नियमशास्त्रातील कर्मामुळे नाही.
Explore रोमकरांस 3:28
7
रोमकरांस 3:4
नक्कीच नाही! प्रत्येक मनुष्य लबाड असला तरी परमेश्वर खरेच आहेत. यासंबंधी असे लिहिले आहे: “हे सारे तू पाहिले आहेस आणि म्हणून माझ्याविरुद्ध तू दिलेला निकाल यथान्याय आहे.”
Explore रोमकरांस 3:4
Home
Bible
Plans
Videos