एखाद्या गुंडाळीप्रमाणे अंतराळ गुंडाळले गेले, आणि प्रत्येक पर्वत व बेट हादरून आपल्या जागेवरून ढळले.
तेव्हा पृथ्वीवरील राजे, राजपुत्र, सैन्याचे उच्चाधिकारी, श्रीमंत तसेच बलवान लोक, सर्व लहान थोर माणसे, गुलाम आणि स्वतंत्र लोक, सारे जण डोंगराच्या गुहांमध्ये व खडकांमध्ये दडून बसले.