1
स्तोत्र. 91:2
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी
मी परमेश्वराविषयी म्हणेन की, “तो माझा आश्रय आणि माझा किल्ला आहे, माझा देव, ज्यावर मी विश्वास ठेवतो.”
Compare
Explore स्तोत्र. 91:2
2
स्तोत्र. 91:1
जो परात्पराच्या आश्रयात राहतो, तो सर्वसामर्थ्याच्या सावलीत राहील.
Explore स्तोत्र. 91:1
3
स्तोत्र. 91:15
जेव्हा तो माझा धावा करील तेव्हा मी त्यास उत्तर देईन; संकटसमयी मी त्याच्याबरोबर राहीन; मी त्यास विजय देईन आणि त्याचा सन्मान करीन.
Explore स्तोत्र. 91:15
4
स्तोत्र. 91:11
कारण तुझ्या सर्व मार्गात तुझे रक्षण करण्याची, तुझ्याविषयी तो आपल्या दिव्यदूतांना आज्ञा देईल.
Explore स्तोत्र. 91:11
5
स्तोत्र. 91:4
तो तुला आपल्या पंखानी झाकील, आणि तुला त्याच्या पंखाखाली आश्रय मिळेल. त्याचे सत्य ढाल व कवच आहे.
Explore स्तोत्र. 91:4
6
स्तोत्र. 91:9-10
कारण परमेश्वर माझा आश्रय आहे असे म्हणून तू परात्परालासुद्धा आपले आश्रयस्थान केले आहेस. तुमच्यावर वाईट मात करणार नाही. तुमच्या घराजवळ कोणतीही पिडा येणार नाही.
Explore स्तोत्र. 91:9-10
7
स्तोत्र. 91:3
कारण तो तुला पारध्याच्या पाशातून आणि नाश करणाऱ्या मरीपासून तुला सोडवील.
Explore स्तोत्र. 91:3
8
स्तोत्र. 91:7
तुझ्या एका बाजूला हजार पडले, आणि तुमच्या उजव्या हातास दहा हजार पडले, पण तरी ती तुझ्याजवळ येणार नाही.
Explore स्तोत्र. 91:7
9
स्तोत्र. 91:5-6
रात्रीच्या दहशतीचे भय, किंवा दिवसा उडणाऱ्या बाणाला, किंवा अंधारात फिरणाऱ्या मरीला किंवा भर दुपारी नाश करणाऱ्या पटकीला तू भिणार नाहीस.
Explore स्तोत्र. 91:5-6
Home
Bible
Plans
Videos