1
फिलिप्पैकरांस पत्र 2:3-4
पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)
तट पाडण्याच्या अथवा पोकळ डौल मिरवण्याच्या बुद्धीने काहीही करू नका, तर लीनतेने एकमेकांना आपल्यापेक्षा श्रेष्ठ माना. तुम्ही कोणीही आपलेच हित पाहू नका, तर दुसर्यांचेही पाहा.
Compare
Explore फिलिप्पैकरांस पत्र 2:3-4
2
फिलिप्पैकरांस पत्र 2:5
अशी जी चित्तवृत्ती ख्रिस्त येशूच्या ठायी होती ती तुमच्या ठायीही असो
Explore फिलिप्पैकरांस पत्र 2:5
3
फिलिप्पैकरांस पत्र 2:6-8
तो देवाच्या स्वरूपाचा असूनही देवाच्या बरोबरीचे असणे हा लाभ आहे असे त्याने मानले नाही, तर त्याने स्वतःला रिक्त केले, म्हणजे मनुष्याच्या प्रतिरूपाचे होऊन दासाचे स्वरूप धारण केले. आणि मनुष्यप्रकृतीचे असे प्रकट होऊन त्याने मरण, आणि तेही वधस्तंभावरचे मरण सोसले; येथपर्यंत आज्ञापालन करून त्याने स्वतःला लीन केले.
Explore फिलिप्पैकरांस पत्र 2:6-8
4
फिलिप्पैकरांस पत्र 2:13
कारण इच्छा करणे व कृती करणे हे तुमच्या ठायी आपल्या सत्संकल्पासाठी साधून देणारा तो देव आहे.
Explore फिलिप्पैकरांस पत्र 2:13
5
फिलिप्पैकरांस पत्र 2:9-11
ह्यामुळे देवाने त्याला अत्युच्च केले, आणि सर्व नावांपेक्षा जे श्रेष्ठ नाव ते त्याला दिले; ह्यात हेतू हा की, स्वर्गात, पृथ्वीवर व पृथ्वीखाली प्रत्येक गुडघा येशूच्या नावाने टेकला जावा, आणि देवपित्याच्या गौरवासाठी प्रत्येक जिभेने येशू ख्रिस्त हा प्रभू आहे असे कबूल करावे.
Explore फिलिप्पैकरांस पत्र 2:9-11
6
फिलिप्पैकरांस पत्र 2:14-15
जे काही तुम्ही कराल ते कुरकुर व वादविवाद न करता करा; ह्यासाठी की, ह्या कुटिल व विपरीत पिढीत तुम्ही निर्दोष व निरुपद्रवी अशी देवाची निष्कलंक मुले असे व्हावे. त्या लोकांमध्ये तुम्ही जीवनाचे वचन पुढे करून दाखवताना ज्योतीसारखे जगात दिसता
Explore फिलिप्पैकरांस पत्र 2:14-15
7
फिलिप्पैकरांस पत्र 2:12
म्हणून माझ्या प्रिय जनहो, जे तुम्ही सर्वदा आज्ञापालन करत आला आहात, ते तुम्ही, मी जवळ असता केवळ नव्हे तर विशेषेकरून आता, म्हणजे मी जवळ नसताही, भीत व कापत आपले तारण साधून घ्या
Explore फिलिप्पैकरांस पत्र 2:12
Home
Bible
Plans
Videos