Лого на YouVersion
Иконка за търсене

मत्तय 3

3
बप्तिस्मा देणाऱ्या योहानाचा संदेश
1अन् त्या दिवसामध्ये योहान बाप्तिस्मा देणारा आला, अन् यहुदीया प्रांताच्या सुनसान जागी तो हा संदेश देत होता, कि 2“आपआपल्या पापांपासून पश्चाताप करा अन् बाप्तिस्मा घ्या तवा देव तुमाले तुमच्या पापांपासून क्षमा देईन.” कावून कि स्वर्गाच राज्य जवळ आलं हाय.
3कावून कि, ज्याच्या विषयात यशया भविष्यवक्त्याच्या इकडून म्हतल्या गेलं होतं, कि “सुनसान जागी कोणी तरी लोकायले हे म्हणत होता, कि देवाचा रस्ता तयार करा, अन् त्याचे रस्ते मोकळे करा.” 4अन् योहान बाप्तिस्मा देणारा उंटाच्या केसानं पासून बनवलेले कपडे घालायचा व त्याच्या कमरीले चांबड्याचा कमरपट्टा बांधत जाय, व तो गवतातले उडणारे घोडे अन् सयद खात जाय.
5-6तवा सगळ्या यरुशलेम शहरातले व यहुदीया प्रांतातले अन् यरदन नदीच्या आजूबाजूच्या बऱ्याचं भागातून लोकं योहान बाप्तिस्मा देणाऱ्या पासी आले, अन् त्यायनं आपआपल्या पापायले कबूल करून यरदन नदीत बाप्तिस्मा घेतला.
7पण जवा त्यानं बरेचसे परुशी #3:7 परुशी येशू खिस्ताच्या दिवसात सगळ्यात प्रभावशाली यहुदी समाजातले, लोकं जे मोशेच्या नियमशास्त्राच कठोर पणान पालन करणारे परुशी लोकं अन् सदुकी #3:7 सदुकी हे पण पुरनियो अन् वरच्या दरजेचा एक यहुदी समाजाचे होते, येशू ख्रिस्ताच्या दिवसात आत्मिक गोष्टीवर विश्वास करत नाई होते.लोकं जे यहुदी समाजाचे दोन धार्मिक पंथ हायत, त्यायले बाप्तिस्मा घेयाले आपल्यापासी येतांना पायलं, तवा त्यायले म्हतलं “तुमी जहरीले सर्पाच्या पिल्या सारखे हा, तुमाले कोण सावध केलं कि देवाच्या येणाऱ्या संकटापासून पयावं. 8आपल्या कामाच्या द्वारे तुमी हे दाखवा कि तुमी खरोखर पश्चाताप केला हाय, 9अन् आपल्या-आपल्या मनात हे विचार करू नका, कि तुमचे पूर्वज अब्राहामाच्या खानदानीतले हायत, कावून कि मी तुमाले सांगतो, कि देव या गोट्यायपासुन अब्राहामासाठी लेकरं करायला समर्थ हाय.
10अन् आता देवाच्या न्यायाची कुऱ्हाड झाडाच्या मुयीपासी ठेवली हाय, म्हणून तो हरेक झाड जे चांगलं फळ देत नाई. तो त्या झाडायले तोडून आगीत फेकून देईन.
11मी तर पाण्याने आपल्या पापापासून मन फिरव्याचा बाप्तिस्मा देतो, पण जो माह्याल्या मांगून येऊ रायला, तो माह्याल्या हून शक्तिशाली हाय, मी तर त्याच्यावाली चप्पल पण उचल्याच्या योग्य नाई, तो तुमाले पवित्र आत्म्या अन् आगीने बाप्तिस्मा देईन.
12अन् तो तयार हाय, गवातून भुसा बायर काढ्याले त्याची सुफळी त्याच्यावाल्या हातात हाय, अन् तो चांगल्या प्रकारे जागा सपा करीन, अन् आपल्या गव्हाले तर कोठारीत साठविण, पण भुसा कधी न ईजणाऱ्या इस्तवात जाळून टाकीन.”
योहाना कडून येशू ख्रिस्ताचा बाप्तिस्मा
(मार्क 1:9-11; लूका 3:21-22)
13तवा त्यावाक्ती येशू ख्रिस्त गालील प्रांताच्या यरदन नदीच्या किनाऱ्यावर योहानापासी बाप्तिस्मा घीयाले आला. 14पण योहान बाप्तिस्मा देणारा त्याले हे म्हणून म्हणा करू लागला, “मले तर तुह्याल्या हातून बाप्तिस्मा घीयाची आवश्यक्ता हाय, अन् तू माह्याल्या पासी आला हाय.”
15तवा येशूनं त्याले हे उत्तर देलं, “आता तर असचं होऊ दे, कावून कि आपल्याले अशाचं प्रकारे सगळ्या धार्मिकतेले पूर्ण करनं ठिक हाय” तवा त्यानं त्याची गोष्ट मानली.
16येशूनं योहान पासून बाप्तिस्मा घेतल्यावर तो जसाच पाण्यातून बायर आला, अन् पाहा, त्याच्यासाठी स्वर्ग उघडलं अन् त्यानं देवाच्या आत्म्याले कबुतरा सारखं, आपल्या वरते येतांना पायलं 17अन् पाहा, हे स्वर्गातून वाणी झाली, कि “हा माह्या आवडता पोरगा हाय, ज्याच्यावर मी लय खुश हावो.”

Избрани в момента:

मत्तय 3: VAHNT

Маркирай стих

Споделяне

Копиране

None

Искате ли вашите акценти да бъдат запазени на всички ваши устройства? Регистрирайте се или влезте