1
उत्पत्ती 22:14
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती
म्हणून अब्राहामाने त्या जागेचे नाव “याहवेह यिरेह” आजपर्यंत “याहवेहच्या डोंगरावर पुरवठा केला जाईल,” असे बोलले जाते.
Qhathanisa
Hlola उत्पत्ती 22:14
2
उत्पत्ती 22:2
मग परमेश्वर म्हणाले, “तुझा पुत्र, ज्याच्यावर तू प्रीती करतोस तो तुझा एकुलता एक पुत्र इसहाकाला बरोबर घे आणि मोरिया प्रदेशात जा आणि त्या ठिकाणी मी तुला जो डोंगर दाखवेन त्या डोंगरावर त्याचे होमार्पण कर.”
Hlola उत्पत्ती 22:2
3
उत्पत्ती 22:12
“मुलावर आपला हात उगारू नको.” तो म्हणाला, “त्याला काहीही करू नकोस. तुला परमेश्वराचे भय आहे हे मला समजले आहे, कारण तुझा पुत्र, एकुलता एक पुत्र मला अर्पिण्याचे तू नाकारले नाहीस.”
Hlola उत्पत्ती 22:12
4
उत्पत्ती 22:8
अब्राहामाने उत्तर दिले, “परमेश्वर होमार्पणासाठी कोकरू पुरवतील, माझ्या मुला.” आणि ते दोघे एकत्र पुढे गेले.
Hlola उत्पत्ती 22:8
5
उत्पत्ती 22:17-18
म्हणून मी तुला निश्चितच आशीर्वादित करेन आणि वृद्धिंगत करून तुझी संतती आकाशातील तार्यांइतकी आणि समुद्रतीरावरील वाळू इतकी करेन. तुझी संतती आपल्या सर्व शत्रूंची शहरे हस्तगत करेल, आणि तू माझ्या आज्ञा पाळल्या आहेस, म्हणून पृथ्वीवरील सर्व राष्ट्रे तुझ्या वंशजापासून आशीर्वादित होतील.”
Hlola उत्पत्ती 22:17-18
6
उत्पत्ती 22:1
काही वेळेनंतर परमेश्वराने अब्राहामाची परीक्षा घेतली. परमेश्वराने त्यास म्हटले, “अब्राहामा!” “हा, मी इथे आहे,” तो उत्तरला.
Hlola उत्पत्ती 22:1
7
उत्पत्ती 22:11
त्याच क्षणाला याहवेहचा दूत स्वर्गातून ओरडून म्हणाला, “अब्राहामा, अब्राहामा!” “हा मी इथे आहे,” तो उत्तरला.
Hlola उत्पत्ती 22:11
8
उत्पत्ती 22:15-16
नंतर याहवेहच्या दूताने अब्राहामाला स्वर्गातून दुसर्यांदा हाक मारली. ते म्हणाले, “मी याहवेह, स्वतःचीच शपथ घेऊन तुला सांगतो की, कारण तू हे केलेस आणि स्वतःच्या पुत्राला, एकुलत्या एक पुत्राला अर्पण करण्यास तू नाकारले नाहीस
Hlola उत्पत्ती 22:15-16
9
उत्पत्ती 22:9
परमेश्वराने ज्या ठिकाणी जाण्यास सांगितले होते त्या जागी आल्यावर अब्राहामाने एक वेदी बांधली आणि त्यावर त्याने लाकडे रचून ठेवली. त्याने आपला पुत्र इसहाकाला बांधले आणि वेदीवरील लाकडांवर ठेवले
Hlola उत्पत्ती 22:9
Ikhaya
IBhayibheli
Amapulani
Amavidiyo