1
उत्पत्ती 24:12
पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)
आणि तो म्हणाला, “हे परमेश्वरा, माझा धनी अब्राहाम ह्याच्या देवा, तू आज कृपा करून माझी कार्यसिद्धी कर; माझा धनी अब्राहाम ह्याच्यावर दया कर.
Qhathanisa
Hlola उत्पत्ती 24:12
2
उत्पत्ती 24:14
तर असे घडून येऊ दे की ज्या मुलीला मी म्हणेन, मला पाणी पाजण्यासाठी आपली घागर उतर, आणि ती मला म्हणेल, तू पी आणि तुझ्या उंटांनाही मी पाजते, तीच तुझा सेवक इसहाक ह्याच्यासाठी तू नेमलेली असो; ह्यावरून मला कळेल की तू माझ्या धन्यावर दया केली आहेस.”
Hlola उत्पत्ती 24:14
3
उत्पत्ती 24:67
मग इसहाकाने तिला आपली आई सारा हिच्या डेर्यात आणले, त्याने रिबकेचा स्वीकार केला. ती त्याची पत्नी झाली. आणि तिच्यावर त्याचे प्रेम होते; आपल्या आईच्या पश्चात इसहाक सांत्वन पावला.
Hlola उत्पत्ती 24:67
4
उत्पत्ती 24:60
त्यांनी रिबकेला आशीर्वाद देऊन म्हटले, “बाई ग, तू सहस्रावधींची, लक्षावधींची जननी हो व तुझी संतती आपल्या वैर्यांच्या नगरांची सत्ता पावो.”
Hlola उत्पत्ती 24:60
5
उत्पत्ती 24:3-4
मी तुला परमेश्वराची, आकाश व पृथ्वी ह्यांच्या देवाची शपथ घेण्यास सांगतो की ज्या कनानी लोकांत मी राहत आहे त्यांच्या मुलींपैकी कोणतीही नवरी माझ्या मुलासाठी तू पाहणार नाहीस. तर माझ्या देशाला माझ्या आप्तांकडे जाऊन तेथून माझा मुलगा इसहाक ह्याच्यासाठी नवरी पाहून आणशील.”
Hlola उत्पत्ती 24:3-4
Ikhaya
IBhayibheli
Amapulani
Amavidiyo