1
योहान 19:30
पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)
आंब घेतल्यानंतर येशूने म्हटले, “पूर्ण झाले आहे” आणि मस्तक लववून त्याने प्राण सोडला.
เปรียบเทียบ
สำรวจ योहान 19:30
2
योहान 19:28
ह्यानंतर आता सर्व पूर्ण झाले आहे, हे जाणून धर्मशास्त्रलेख पूर्ण व्हावा म्हणून येशूने म्हटले, ‘मला तहान लागली आहे’.
สำรวจ योहान 19:28
3
योहान 19:26-27
येशूने त्याच्या आईला व ज्या शिष्यावर त्याची प्रीती होती त्याला जवळ उभे राहिलेले पाहून आईला म्हटले, “बाई, पाहा, हा तुझा मुलगा!” नंतर त्याने त्या शिष्याला म्हटले, “पाहा, ही तुझी आई!” आणि त्यानंतर त्या शिष्याने तिला आपल्या घरी नेले.
สำรวจ योहान 19:26-27
4
योहान 19:33-34
परंतु येशूजवळ आल्यावर तो आधीच मरण पावला आहे, असे पाहून त्यांनी त्याचे पाय मोडले नाहीत. तरी पण शिपायांतील एकाने त्याच्या कुशीत भाला भोसकला. लगेच रक्त व पाणी बाहेर निघाले.
สำรวจ योहान 19:33-34
5
योहान 19:36-37
‘त्याचे हाड मोडले जाणार नाही’, हा धर्मशास्त्रलेख पूर्ण व्हावा म्हणून ह्या गोष्टी घडल्या. शिवाय दुसऱ्याही धर्मशास्त्रलेखात असे म्हटले आहे, ‘ज्याला त्यांनी भोसकले त्याच्याकडे ते पाहतील.’
สำรวจ योहान 19:36-37
6
योहान 19:17
त्यांनी येशूला ताब्यात घेतले. तो त्याचा क्रूस स्वतः वाहत कवटीचे स्थान म्हटलेल्या जागी गेला. त्या जागेला हिब्रू भाषेत गोलगोथा म्हणतात.
สำรวจ योहान 19:17
7
योहान 19:2
शिपायांनी काट्यांचा मुकुट गुंफून त्याच्या डोक्यावर ठेवला व त्याला जांभळा झगा घातला.
สำรวจ योहान 19:2
หน้าหลัก
พระคัมภีร์
แผนการอ่านต่างๆ
วิดีโอ