1
लूक 16:10
पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)
जो अगदी थोडक्याविषयी विश्वासू आहे तो पुष्कळाविषयीही विश्वासू आहे आणि जो अगदी थोडक्याविषयी अप्रामाणिक आहे तो पुष्कळाविषयीही अप्रामाणिक आहे.
Krahaso
Eksploroni लूक 16:10
2
लूक 16:13
कोणत्याही दासाला दोन धन्यांची सेवाचाकरी करता येत नाही. तो एकाचा द्वेष करील व दुसऱ्यावर प्रीती करील अथवा एकाला धरून राहील व दुसऱ्याला तुच्छ मानील. तुम्हांला देवाची व धनाची सेवाचाकरी करता येणार नाही.”
Eksploroni लूक 16:13
3
लूक 16:11-12
म्हणून जर तुम्ही अनीतिकारक धनाविषयी विश्वासू झाला नाही, तर जे खरे धन ते तुम्हांला कोण सोपवून देईल? तसेच जे दुसऱ्याचे त्याविषयी तुम्ही विश्वासू झाला नाही, तर जे तुमचे स्वतःचे आहे, ते तुम्हांला कोण देईल?
Eksploroni लूक 16:11-12
4
लूक 16:31
तेव्हा त्याने त्याला म्हटले, ‘ते मोशेचे व संदेष्ट्यांचे ऐकत नसतील, तर मेलेल्यांमधूनसुद्धा कोणी उठला तरी त्यांची खातरी पटणार नाही.’”
Eksploroni लूक 16:31
5
लूक 16:18
जो कोणी आपली पत्नी टाकून दुसरीबरोबर लग्न करतो तो व्यभिचार करतो आणि पतीने टाकलेल्या स्त्रीबरोबर जो लग्न करतो, तो व्यभिचार करतो.
Eksploroni लूक 16:18
Kreu
Bibla
Plane
Video