1
उत्पत्ती 4:7
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती
तू योग्य ते केलेस तर तुझाही स्वीकार केला जाणार नाही काय? पण तू योग्य ते करण्याचे नाकारशील तर सावध राहा, तुझा सर्वनाश करावा म्हणून पाप तुझ्या दारावर हल्ला करण्यास टपून बसले आहे; पण त्यावर तू विजय मिळव.”
Yenzanisa
Ongorora {{vhesi}}
2
उत्पत्ती 4:26
शेथ मोठा झाल्यावर त्यालाही एक पुत्र झाला, त्याचे नाव अनोश असे ठेवले. त्याच्या हयातीत लोकांनी याहवेहच्या नावाने आराधना करण्यास प्रारंभ केला.
3
उत्पत्ती 4:9
मग याहवेहने काईनाला विचारले, “तुझा भाऊ हाबेल कुठे आहे?” “मला माहीत नाही.” त्याने प्रत्युत्तर दिले. “मी काय माझ्या भावाचा राखणदार आहे?”
4
उत्पत्ती 4:10
याहवेह त्याला म्हणाले, “तू हे काय केलेस? आता ऐक, तुझ्या भावाचे रक्त मला जमिनीतून हाक मारीत आहे.
5
उत्पत्ती 4:15
यावर याहवेहने त्याला उत्तर दिले, “असे होणार नाही, जर कोणी काईनाचा जीव घेईल, तर त्याला मी तुला दिलेल्या शिक्षेपेक्षा सातपट शिक्षा देईन” आणि मग त्याचा वध कोणीही करू नये, असा इशारा देणारी एक खूण याहवेहने काईनावर केली.
Pekutangira
Bhaibheri
Zvirongwa
Mavideo