1
मत्तय 10:16
मराठी समकालीन आवृत्ती
“मेंढरांनी लांडग्यांमध्ये जावे त्याप्रमाणे मी तुम्हाला पाठवीत आहे म्हणून तुम्ही सर्पासारखे चतुर आणि कबुतरांसारखे भोळे असा.
Yenzanisa
Ongorora {{vhesi}}
2
मत्तय 10:39
जो आपल्या जीवाला जपतो, तो आपला जीव गमावील आणि जो माझ्याकरिता आपला जीव गमावतो, तो आपला जीव सुरक्षित राखील.
3
मत्तय 10:28
जे तुमच्या शरीराचा वध करू शकतात परंतु आत्म्याचा नाश करू शकत नाहीत, अशांना भिऊ नका. तर तुमचा आत्मा आणि शरीर या दोहोंचा नरकामध्ये जे नाश करू शकतात त्या परमेश्वराचे मात्र भय धरा.
4
मत्तय 10:38
जो कोणी आपला क्रूसखांब उचलून घेऊन माझ्यामागे येत नाही तो मला पात्र नाही.
5
मत्तय 10:32-33
“जो कोणी मला जाहीरपणे स्वीकारेल, तर मीही त्याचा माझ्या स्वर्गीय पित्यासमोर जाहीरपणे स्वीकार करीन. तरी जे मला येथे लोकांसमोर नाकारतात, तर मीही त्यांना माझ्या स्वर्गीय पित्यासमोर जाहीरपणे नाकारीन.
6
मत्तय 10:8
आजार्यांना बरे करा, मृतांना जिवंत करा, कुष्ठरोग्यांना शुद्ध करा, भूतग्रस्तांतून भुते काढून टाका. तुम्हाला मुक्तहस्ताने मिळाले आहे, तुम्हीही मुक्तहस्ते द्या.
7
मत्तय 10:31
म्हणून भीती बाळगू नका, कारण तुम्ही पुष्कळ चिमण्यांपेक्षा अधिक मोलवान आहात.
8
मत्तय 10:34
“मी पृथ्वीवर शांती देण्यासाठी आलो आहे अशी कल्पना करू नका. शांती देण्यासाठी नाही, तर तलवार चालवण्यास आलो आहे.
Pekutangira
Bhaibheri
Zvirongwa
Mavideo