1
मत्तय 15:18-19
पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)
मात्र जे तोंडातून निघते ते अंतःकरणातून येते व माणसाला अशुद्ध करते. अंतःकरणातूनच दुष्ट कल्पना, खून, व्यभिचार आणि लैंगिक अनैतिकता, तसेच चोऱ्या, खोट्या साक्षी व निंदानालस्ती निघतात.
Yenzanisa
Ongorora {{vhesi}}
2
मत्तय 15:11
जे तोंडातून आत जाते ते माणसाला अशुद्ध करत नाही, तर जे तोंडातून बाहेर निघते ते माणसाला अशुद्ध करते.”
3
मत्तय 15:8-9
हे लोक ओठांनी माझा सन्मान करतात, परंतु त्यांचे अंतःकरण माझ्यापासून दूर आहे. धर्मशास्त्र म्हणून ते माझी व्यर्थ उपासना करतात कारण ते मनुष्यांचे नियम शिकवतात.”
4
मत्तय 15:28
नंतर येशूने तिला उत्तर दिले, “बाई, तुझा विश्वास मोठा आहे. तुझी इच्छा सफळ होवो!” आणि त्याच घटकेस तिची मुलगी बरी झाली!
5
मत्तय 15:25-27
ती येऊन त्याच्या पाया पडून म्हणाली, “प्रभो, मला साहाय्य करा.” त्याने उत्तर दिले, “मुलांची भाकर घेऊन ती घरच्या कुत्र्यांना टाकणे ठीक नाही.” तिने म्हटले, “खरे आहे, प्रभो, तरीही कुत्रीदेखील आपल्या धन्याच्या मेजावरून पडलेला चुरा खातात.”
Pekutangira
Bhaibheri
Zvirongwa
Mavideo