YouVersion လိုဂို
ရှာရန် အိုင်ကွန်

उत्पत्ती 6:1-4

उत्पत्ती 6:1-4 MRCV

पृथ्वीवर मानवाची संख्या खूप वाढू लागली आणि त्यांना कन्या झाल्या. परमेश्वराच्या पुत्रांनी बघितले की मानवाच्या कन्या सुंदर आहेत; आणि आपल्या आवडीप्रमाणे त्यांनी त्यांच्याशी विवाह केला. तेव्हा याहवेह म्हणाले, “माझा आत्मा मानवासोबत वादविवाद करीत राहणार नाही, कारण ते दैहिक आहेत आणि त्यांचा जीवनकाल एकशेवीस वर्षे असेल.” त्या दिवसात—आणि नंतरच्या काळातही—महाबलाढ्य मानव पृथ्वीवर वास करीत होते, जेव्हा परमेश्वराच्या पुत्रांनी मानवकन्यांशी विवाह केला, त्यांना संतती झाली. तेच जुन्या काळातील समर्थ आणि प्रसिद्ध मानव झाले.