परमेश्वर मला साहाय्य झाला नसता तर माझ्या जिवाची वस्ती नि:शब्दस्थानी केव्हाच झाली असती.
“माझा पाय घसरला,” असे मी म्हणालो, तेव्हा हे परमेश्वरा, तुझ्या दयेने मला आधार दिला.
माझे मन अनेक चिंतांनी व्यग्र होते तेव्हा तुझ्यापासून लाभणारे सांत्वन माझ्या जिवाचे समाधान करते.