स्तोत्रसंहिता 9:1-8

मी अगदी मनापासून परमेश्वराचे उपकारस्मरण करीन; तुझ्या सर्व अद्भुत कृतींचे वर्णन करीन. मी तुझ्या ठायी हर्ष व उल्लास पावेन; हे परात्परा, मी तुझ्या नावाचे स्तवन गाईन. माझे वैरी मागे फिरले की ठोकर खातात, तुला पाहून नाश पावतात; कारण तू माझा कैवार घेऊन न्याय केला आहेस; तू यथार्थ न्याय करीत राजासनावर बसला आहेस. तू राष्ट्रांना धमकावले आहेस; दुर्जनांचा तू नाश केला आहेस; तू त्यांचे नाव सदासर्वकाळासाठी पुसून टाकले आहेस. वैर्यांचा समूळ नाश झाला आहे, त्यांचा कायमचा नायनाट झाला आहे; जी शहरे तू उजाड केली त्यांची आठवणदेखील नाहीशी झाली आहे. परमेश्वर तर सर्वकाळ राजासनारूढ आहे; त्याने न्याय करण्याकरता आपले आसन स्थापले आहे. तोच जगाचा यथार्थ न्याय करील; तो लोकांना खरा न्याय देईल.
स्तोत्रसंहिता 9:1-8