YouVersion लोगो
सर्च आयकॉन

स्तोत्रसंहिता 9:1-12

स्तोत्रसंहिता 9:1-12 - मी अगदी मनापासून परमेश्वराचे उपकारस्मरण करीन; तुझ्या सर्व अद्भुत कृतींचे वर्णन करीन.
मी तुझ्या ठायी हर्ष व उल्लास पावेन; हे परात्परा, मी तुझ्या नावाचे स्तवन गाईन.
माझे वैरी मागे फिरले की ठोकर खातात, तुला पाहून नाश पावतात;
कारण तू माझा कैवार घेऊन न्याय केला आहेस; तू यथार्थ न्याय करीत राजासनावर बसला आहेस.
तू राष्ट्रांना धमकावले आहेस; दुर्जनांचा तू नाश केला आहेस; तू त्यांचे नाव सदासर्वकाळासाठी पुसून टाकले आहेस.
वैर्‍यांचा समूळ नाश झाला आहे, त्यांचा कायमचा नायनाट झाला आहे; जी शहरे तू उजाड केली त्यांची आठवणदेखील नाहीशी झाली आहे.
परमेश्वर तर सर्वकाळ राजासनारूढ आहे; त्याने न्याय करण्याकरता आपले आसन स्थापले आहे.
तोच जगाचा यथार्थ न्याय करील; तो लोकांना खरा न्याय देईल.
परमेश्वर पीडितांसाठी उच्च दुर्ग आहे; तो संकटसमयी उच्च दुर्ग आहे;
ज्यांना तुझ्या नावाची ओळख झालेली आहे ते तुझ्यावर भाव ठेवतील, कारण, हे परमेश्वरा, जे तुझा शोध करतात त्यांना तू टाकले नाहीस.
सीयोननिवासी परमेश्वराचे स्तवन करा, त्याची कृत्ये राष्ट्राराष्ट्रांत विदित करा;
कारण रक्तपाताचा सूड उगवणार्‍यास त्यांची आठवण आहे; तो दीनांचा आक्रोश विसरला नाही.

मी अगदी मनापासून परमेश्वराचे उपकारस्मरण करीन; तुझ्या सर्व अद्भुत कृतींचे वर्णन करीन. मी तुझ्या ठायी हर्ष व उल्लास पावेन; हे परात्परा, मी तुझ्या नावाचे स्तवन गाईन. माझे वैरी मागे फिरले की ठोकर खातात, तुला पाहून नाश पावतात; कारण तू माझा कैवार घेऊन न्याय केला आहेस; तू यथार्थ न्याय करीत राजासनावर बसला आहेस. तू राष्ट्रांना धमकावले आहेस; दुर्जनांचा तू नाश केला आहेस; तू त्यांचे नाव सदासर्वकाळासाठी पुसून टाकले आहेस. वैर्‍यांचा समूळ नाश झाला आहे, त्यांचा कायमचा नायनाट झाला आहे; जी शहरे तू उजाड केली त्यांची आठवणदेखील नाहीशी झाली आहे. परमेश्वर तर सर्वकाळ राजासनारूढ आहे; त्याने न्याय करण्याकरता आपले आसन स्थापले आहे. तोच जगाचा यथार्थ न्याय करील; तो लोकांना खरा न्याय देईल. परमेश्वर पीडितांसाठी उच्च दुर्ग आहे; तो संकटसमयी उच्च दुर्ग आहे; ज्यांना तुझ्या नावाची ओळख झालेली आहे ते तुझ्यावर भाव ठेवतील, कारण, हे परमेश्वरा, जे तुझा शोध करतात त्यांना तू टाकले नाहीस. सीयोननिवासी परमेश्वराचे स्तवन करा, त्याची कृत्ये राष्ट्राराष्ट्रांत विदित करा; कारण रक्तपाताचा सूड उगवणार्‍यास त्यांची आठवण आहे; तो दीनांचा आक्रोश विसरला नाही.

स्तोत्रसंहिता 9:1-12

स्तोत्रसंहिता 9:1-12