स्तोत्रसंहिता 77:10-14
“परात्पराचे सामर्थ्य खालावले आहे”1 असे वाटून मला दु:ख झाले. मी परमेशाची महत्कृत्ये वर्णन करीन; खरोखर मी तुझ्या पुरातन कालच्या अद्भुत कृत्यांचे स्मरण करीन. मी तुझ्या सर्व कृत्यांचे मननही करीन आणि तुझ्या महत्कृत्यांचा विचार करीन. हे देवा, तुझा मार्ग पवित्र2 आहे; देवासारखा थोर देव कोण आहे? अद्भुत कृत्ये करणारा तूच देव आहेस; तू आपले सामर्थ्य लोकांत प्रकट केले आहेस.
स्तोत्रसंहिता 77:10-14