YouVersion लोगो
सर्च आयकॉन

स्तोत्रसंहिता 34:8-15

स्तोत्रसंहिता 34:8-15 - परमेश्वर किती चांगला आहे ह्याचा अनुभव घेऊन पाहा; जो त्याच्यावर भाव ठेवतो तो पुरुष धन्य!
परमेश्वराचे पवित्र जनहो, त्याचे भय धरा, कारण त्याचे भय धरणार्‍यांना काही उणे पडत नाही.
तरुण सिंहांनाही वाण पडते व त्यांची उपासमार होते; पण परमेश्वराला शरण जाणार्‍यांना कोणत्याही चांगल्या वस्तूची वाण पडत नाही.
मुलांनो या, माझे ऐका; मी तुम्हांला परमेश्वराचे भय धरायला शिकवीन.
सुख भोगावे म्हणून जीविताची इच्छा धरणारा; व दीर्घायुष्याची इच्छा धरणारा असा मनुष्य कोण?
तू आपली जीभ दुर्भाषणापासून व आपले ओठ कपटी भाषणापासून आवर,
वाइटाचा त्याग कर व बरे ते कर, शांतीच्या प्राप्तीसाठी प्रयत्न कर व तिचे अवलंबन कर.
परमेश्वराचे नेत्र नीतिमानांकडे असतात; त्याचे कान त्यांच्या हाकेकडे असतात.

परमेश्वर किती चांगला आहे ह्याचा अनुभव घेऊन पाहा; जो त्याच्यावर भाव ठेवतो तो पुरुष धन्य! परमेश्वराचे पवित्र जनहो, त्याचे भय धरा, कारण त्याचे भय धरणार्‍यांना काही उणे पडत नाही. तरुण सिंहांनाही वाण पडते व त्यांची उपासमार होते; पण परमेश्वराला शरण जाणार्‍यांना कोणत्याही चांगल्या वस्तूची वाण पडत नाही. मुलांनो या, माझे ऐका; मी तुम्हांला परमेश्वराचे भय धरायला शिकवीन. सुख भोगावे म्हणून जीविताची इच्छा धरणारा; व दीर्घायुष्याची इच्छा धरणारा असा मनुष्य कोण? तू आपली जीभ दुर्भाषणापासून व आपले ओठ कपटी भाषणापासून आवर, वाइटाचा त्याग कर व बरे ते कर, शांतीच्या प्राप्तीसाठी प्रयत्न कर व तिचे अवलंबन कर. परमेश्वराचे नेत्र नीतिमानांकडे असतात; त्याचे कान त्यांच्या हाकेकडे असतात.

स्तोत्रसंहिता 34:8-15