स्तोत्रसंहिता 119:9-16
तरुण आपला वर्तनक्रम कशाने शुद्ध राखील? तुझ्या वचनानुसार तो राखण्याने. अगदी मनापासून मी तुझा शोध केला आहे; तुझ्या आज्ञांपासून मला बहकू देऊ नकोस. मी तुझ्याविरुद्ध पाप करू नये म्हणून मी आपल्या मनात तुझे वचन जपून ठेवले आहे. हे परमेश्वरा, तू धन्य आहेस; तुझे नियम मला शिकव. मी आपल्या मुखाने तुझ्या तोंडच्या सर्व निर्णयांचे निवेदन करतो. तुझ्या निर्बंधांचा मार्ग हीच माझी धनसंपदा, असे मानून मी अत्यानंद करतो. मी तुझ्या विधींचे मनन करीन, तुझ्या मार्गांकडे लक्ष देईन. मी तुझ्या नियमांनी आनंदित होईन; मी तुझे वचन विसरणार नाही.
स्तोत्रसंहिता 119:9-16