YouVersion लोगो
सर्च आयकॉन

स्तोत्रसंहिता 119:1-8

स्तोत्रसंहिता 119:1-8 - जे आपले वर्तन चोख ठेवून परमेश्वराच्या नियमशास्त्राप्रमाणे चालतात ते धन्य!
जे त्याचे निर्बंध पाळून अगदी मनापासून त्याचा शोध करतात ते धन्य!
ते काही अनीतीचे आचरण करत नाहीत, तर त्याच्या मार्गाने चालतात.
तुझे विधी आम्ही मनःपूर्वक पाळावेत म्हणून तू ते आम्हांला लावून दिले आहेत.
तुझे नियम पाळण्यासाठी माझी वागणूक व्यवस्थित असावी, हेच माझे मागणे आहे.
मी तुझ्या सर्व आज्ञांकडे लक्ष पुरवले तर मी फजीत होणार नाही.
तुझे न्याय्य निर्णय मी शिकेन तेव्हा मी सरळ मनाने तुझे स्तवन करीन.
मी तुझे नियम पाळीन; माझा सर्वस्वी त्याग करू नकोस.