YouVersion लोगो
सर्च आयकॉन

स्तोत्रसंहिता 103:2-12

स्तोत्रसंहिता 103:2-12 - हे माझ्या जिवा, परमेश्वराचा धन्यवाद कर, त्याचे सर्व उपकार विसरू नकोस;
तो तुझ्या सर्व दुष्कर्मांची क्षमा करतो; तो तुझे सर्व रोग बरे करतो;
तो तुझा जीव विनाशगर्तेतून उद्धरतो; तो तुला दया व करुणा ह्यांचा मुकुट घालतो;
तो तुझे आयुष्य उत्तम पदार्थांनी तृप्त करतो; म्हणून तुझे तारुण्य गरुडासारखे नवे होते.
जाचलेल्या सर्वांसाठी परमेश्वर नीतीची व न्यायाची कृत्ये करतो;
त्याने आपले मार्ग मोशेला आणि आपली कृत्ये इस्राएलाच्या वंशजांना विदित केली.
परमेश्वर दयाळू व कृपाळू आहे, तो मंदक्रोध व दयामय आहे.
तो सर्वदाच दोष देत राहणार नाही; तो आपला क्रोध सर्वकाळ राहू देणार नाही.
आमच्या पातकांच्या मानाने त्याने आम्हांला शासन केले नाही, त्याने आमच्या दुष्कृत्यांच्या मानाने आम्हांला प्रतिफळ दिले नाही.
कारण जसे पृथ्वीच्या वर आकाश उंच आहे, तशी त्याची दया त्यांचे भय धरणार्‍यांवर विपुल आहे.
पश्‍चिमेपासून पूर्व जितकी दूर आहे, तितके त्याने आमचे अपराध आमच्यापासून दूर केले आहेत.

हे माझ्या जिवा, परमेश्वराचा धन्यवाद कर, त्याचे सर्व उपकार विसरू नकोस; तो तुझ्या सर्व दुष्कर्मांची क्षमा करतो; तो तुझे सर्व रोग बरे करतो; तो तुझा जीव विनाशगर्तेतून उद्धरतो; तो तुला दया व करुणा ह्यांचा मुकुट घालतो; तो तुझे आयुष्य उत्तम पदार्थांनी तृप्त करतो; म्हणून तुझे तारुण्य गरुडासारखे नवे होते. जाचलेल्या सर्वांसाठी परमेश्वर नीतीची व न्यायाची कृत्ये करतो; त्याने आपले मार्ग मोशेला आणि आपली कृत्ये इस्राएलाच्या वंशजांना विदित केली. परमेश्वर दयाळू व कृपाळू आहे, तो मंदक्रोध व दयामय आहे. तो सर्वदाच दोष देत राहणार नाही; तो आपला क्रोध सर्वकाळ राहू देणार नाही. आमच्या पातकांच्या मानाने त्याने आम्हांला शासन केले नाही, त्याने आमच्या दुष्कृत्यांच्या मानाने आम्हांला प्रतिफळ दिले नाही. कारण जसे पृथ्वीच्या वर आकाश उंच आहे, तशी त्याची दया त्यांचे भय धरणार्‍यांवर विपुल आहे. पश्‍चिमेपासून पूर्व जितकी दूर आहे, तितके त्याने आमचे अपराध आमच्यापासून दूर केले आहेत.

स्तोत्रसंहिता 103:2-12