स्तोत्रसंहिता 103:19-22
परमेश्वराने आपले राजासन स्वर्गात स्थापले आहे; त्याचे राज्य सर्वांवर आहे. अहो परमेश्वराच्या दूतांनो, जे तुम्ही बलसंपन्न आहात, आणि त्याचा शब्द ऐकून त्याप्रमाणे चालता ते तुम्ही त्याचा धन्यवाद करा. अहो परमेश्वराच्या सर्व सैन्यांनो, जे तुम्ही त्याची सेवा करून त्याचा मनोदय सिद्धीस नेता, ती तुम्ही त्याचा धन्यवाद करा. परमेश्वराच्या सर्व कृत्यांनो, त्याच्या साम्राज्यातील सर्व ठिकाणी त्याचा धन्यवाद करा; हे माझ्या जिवा, परमेश्वराचा धन्यवाद कर.
स्तोत्रसंहिता 103:19-22