YouVersion लोगो
सर्च आयकॉन

नीतिसूत्रे 16:18-25

नीतिसूत्रे 16:18-25 - गर्व झाला की नाश ठेवलेला; मनाचा ताठा अध:पाताचे मूळ होय.
गर्विष्ठांबरोबर राहून लूट वाटून घेण्यापेक्षा दीनांबरोबर नम्रचित्त असणे बरे.
जो वचनाकडे लक्ष पुरवतो त्याचे कल्याण होते; जो परमेश्वरावर भाव ठेवतो तो धन्य.
जो मनाचा सुज्ञ त्याला समंजस म्हणतात. मधुर वाणीने शिक्षणाचा संस्कार अधिक होतो.
ज्याच्या ठायी सुज्ञता असते त्याला ती जीवनाच्या झर्‍याप्रमाणे होय. पण मूर्खांची मूर्खता हीच त्यांचे शासन होय.
ज्ञान्याच्या हृदयापासून त्याच्या मुखास शिक्षण मिळते; ते त्याच्या वाणीत ज्ञानाची भर घालते.
ममतेची वचने मधाच्या पोळ्यासारखी मनाला गोड व हाडांना आरोग्य देणारी आहेत.
मनुष्याला एक मार्ग सरळ दिसतो. पण त्याच्या शेवटास मृत्युपथ फुटतात.

गर्व झाला की नाश ठेवलेला; मनाचा ताठा अध:पाताचे मूळ होय. गर्विष्ठांबरोबर राहून लूट वाटून घेण्यापेक्षा दीनांबरोबर नम्रचित्त असणे बरे. जो वचनाकडे लक्ष पुरवतो त्याचे कल्याण होते; जो परमेश्वरावर भाव ठेवतो तो धन्य. जो मनाचा सुज्ञ त्याला समंजस म्हणतात. मधुर वाणीने शिक्षणाचा संस्कार अधिक होतो. ज्याच्या ठायी सुज्ञता असते त्याला ती जीवनाच्या झर्‍याप्रमाणे होय. पण मूर्खांची मूर्खता हीच त्यांचे शासन होय. ज्ञान्याच्या हृदयापासून त्याच्या मुखास शिक्षण मिळते; ते त्याच्या वाणीत ज्ञानाची भर घालते. ममतेची वचने मधाच्या पोळ्यासारखी मनाला गोड व हाडांना आरोग्य देणारी आहेत. मनुष्याला एक मार्ग सरळ दिसतो. पण त्याच्या शेवटास मृत्युपथ फुटतात.

नीतिसूत्रे 16:18-25

नीतिसूत्रे 16:18-25