मार्क 1:4-6
त्याप्रमाणे पापांच्या क्षमेसाठी पश्चात्तापाचा बाप्तिस्मा घ्यावा अशी घोषणा करत बाप्तिस्मा करणारा योहान अरण्यात प्रकट झाला. तेव्हा सगळा यहूदीया देश व सर्व यरुशलेमकर त्याच्याकडे लोटले आणि त्यांनी आपापली पापे पदरी घेऊन यार्देन नदीत त्याच्यापासून बाप्तिस्मा घेतला. योहान उंटाच्या केसांचे वस्त्र पांघरत असे, त्याच्या कंबरेस कातड्याचा कमरबंद असे आणि तो टोळ व रानमध खात असे.
मार्क 1:4-6