[देवाचा पुत्र] येशू ख्रिस्त ह्याच्याविषयीच्या शुभवर्तमानाचा प्रारंभ.
यशया संदेष्ट्याच्या ग्रंथात लिहिले आहे की,
“पाहा, मी आपल्या दूताला तुझ्यापुढे पाठवतो;
तो तुझा मार्ग तयार करील;
अरण्यात घोषणा करणार्याची वाणी झाली,
ती अशी की, परमेश्वराचा मार्ग तयार करा;
त्याच्या ‘वाटा नीट करा.”’