मत्तय 2:1-7
हेरोद राजाच्या काळात यहूदीयातील बेथलेहेमात येशूच्या जन्मानंतर, पाहा, पूर्वेकडून मागी लोक यरुशलेमेस येऊन विचारपूस करू लागले की, “यहूद्यांचा राजा जन्मास आला तो कोठे आहे? कारण आम्ही पूर्व दिशेस त्याचा तारा पाहून त्याला नमन करण्यास आलो आहोत.” हेरोद राजाने हे ऐकले तेव्हा तो व त्याच्याबरोबर सर्व यरुशलेम घाबरून गेले; आणि त्याने प्रजेचे सर्व मुख्य याजक व शास्त्री ह्यांना जमवून विचारले की, “ख्रिस्ताचा जन्म कोठे व्हायचा आहे?” ते त्याला म्हणाले, “यहूदीयातील बेथलेहेमात; कारण संदेष्ट्याच्या द्वारे असे लिहिले आहे की, ‘हे यहूदाच्या प्रांता, बेथलेहेमा, तू यहूदाच्या सर्व सरदारांमध्ये कनिष्ठ आहेस असे मुळीच नाही; कारण माझ्या इस्राएल लोकांचा प्रतिपाळ करील असा सरदार तुझ्यातून निघेल.”’ तेव्हा हेरोदाने मागी लोकांना गुप्तपणे बोलावून त्यांच्यापासून तारा दिसू लागल्याची वेळ नीट विचारून घेतली
मत्तय 2:1-7