YouVersion लोगो
सर्च आयकॉन

मलाखी 3:1-10

मलाखी 3:1-10 - पाहा, माझ्यापुढे मार्ग तयार करण्यासाठी मी आपला निरोप्या पाठवतो; ज्या प्रभूला तुम्ही शोधता तो एकाएकी आपल्या मंदिरात येईल; पाहा, करार घेऊन येणार्‍या निरोप्याची3 तुम्ही अपेक्षा करत आहात, तो येत आहे, असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो.
त्याच्या आगमनाच्या दिवशी कोण निभावेल? तो प्रकट होईल तेव्हा कोण टिकेल? असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो. “कारण तो धातू गाळणार्‍याच्या अग्नीसारखा, परटाच्या खारासारखा आहे;
रुपे गाळून शुद्ध करणार्‍यासारखा तो बसेल, व लेवीच्या वंशजांना शुद्ध करील; त्यांना सोन्यारुप्याप्रमाणे शुद्ध करील. मग ते नीतिमत्तेने परमेश्वराला बली अर्पण करतील.
पूर्वीच्या दिवसांप्रमाणे, प्राचीन वर्षांप्रमाणे यहूदा व यरुशलेम ह्यांचे यज्ञार्पण परमेश्वराला आवडेल.
मी न्याय करायला तुमच्याकडे येईन; आणि जादूगार, व्यभिचारी, खोटे साक्षी ह्यांच्याविरुद्ध आणि मजुरांची मजुरी अडकवून ठेवणारे, विधवा व अनाथ ह्यांच्यावर जुलूम करणारे, आणि मला न भिता परक्याला न्याय मिळू न देणारे ह्यांच्याविरुद्ध साक्ष देण्याची मी त्वरा करीन.

कारण मी परमेश्वर आहे, मी बदलणारा नाही; म्हणून याकोबवंशजहो, तुम्ही नष्ट झाला नाहीत.
तुमच्या पूर्वजांच्या दिवसांपासून माझे विधी तुम्ही मोडले, ते पाळले नाहीत. माझ्याकडे वळा, म्हणजे मी तुमच्याकडे वळेन, असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो. तुम्ही म्हणता, ‘आम्ही कोणत्या बाबतीत वळावे?’
मनुष्य देवाला ठकवील काय? तुम्ही तर मला ठकवले आहे; असे असून तुम्ही म्हणता, ‘आम्ही कोणत्या बाबतीत तुला ठकवले आहे?’ दशमांश व अर्पणे ह्यासंबंधाने.
तुम्ही शापग्रस्त आहात, कारण तुम्ही अवघ्या राष्ट्राने मला फसवले आहे.
सेनाधीश परमेश्वर म्हणतो, माझ्या मंदिरात अन्न असावे म्हणून सगळा दशमांश तुम्ही भांडारात आणा म्हणजे मी आकाशकपाटे उघडून जागा पुरणार नाही एवढ्या आशीर्वादांचा तुमच्यावर वर्षाव करतो की नाही ह्याविषयी माझी प्रचिती पाहा.

पाहा, माझ्यापुढे मार्ग तयार करण्यासाठी मी आपला निरोप्या पाठवतो; ज्या प्रभूला तुम्ही शोधता तो एकाएकी आपल्या मंदिरात येईल; पाहा, करार घेऊन येणार्‍या निरोप्याची3 तुम्ही अपेक्षा करत आहात, तो येत आहे, असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो. त्याच्या आगमनाच्या दिवशी कोण निभावेल? तो प्रकट होईल तेव्हा कोण टिकेल? असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो. “कारण तो धातू गाळणार्‍याच्या अग्नीसारखा, परटाच्या खारासारखा आहे; रुपे गाळून शुद्ध करणार्‍यासारखा तो बसेल, व लेवीच्या वंशजांना शुद्ध करील; त्यांना सोन्यारुप्याप्रमाणे शुद्ध करील. मग ते नीतिमत्तेने परमेश्वराला बली अर्पण करतील. पूर्वीच्या दिवसांप्रमाणे, प्राचीन वर्षांप्रमाणे यहूदा व यरुशलेम ह्यांचे यज्ञार्पण परमेश्वराला आवडेल. मी न्याय करायला तुमच्याकडे येईन; आणि जादूगार, व्यभिचारी, खोटे साक्षी ह्यांच्याविरुद्ध आणि मजुरांची मजुरी अडकवून ठेवणारे, विधवा व अनाथ ह्यांच्यावर जुलूम करणारे, आणि मला न भिता परक्याला न्याय मिळू न देणारे ह्यांच्याविरुद्ध साक्ष देण्याची मी त्वरा करीन. कारण मी परमेश्वर आहे, मी बदलणारा नाही; म्हणून याकोबवंशजहो, तुम्ही नष्ट झाला नाहीत. तुमच्या पूर्वजांच्या दिवसांपासून माझे विधी तुम्ही मोडले, ते पाळले नाहीत. माझ्याकडे वळा, म्हणजे मी तुमच्याकडे वळेन, असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो. तुम्ही म्हणता, ‘आम्ही कोणत्या बाबतीत वळावे?’ मनुष्य देवाला ठकवील काय? तुम्ही तर मला ठकवले आहे; असे असून तुम्ही म्हणता, ‘आम्ही कोणत्या बाबतीत तुला ठकवले आहे?’ दशमांश व अर्पणे ह्यासंबंधाने. तुम्ही शापग्रस्त आहात, कारण तुम्ही अवघ्या राष्ट्राने मला फसवले आहे. सेनाधीश परमेश्वर म्हणतो, माझ्या मंदिरात अन्न असावे म्हणून सगळा दशमांश तुम्ही भांडारात आणा म्हणजे मी आकाशकपाटे उघडून जागा पुरणार नाही एवढ्या आशीर्वादांचा तुमच्यावर वर्षाव करतो की नाही ह्याविषयी माझी प्रचिती पाहा.

मलाखी 3:1-10

मलाखी 3:1-10