YouVersion लोगो
सर्च आयकॉन

विलापगीत 3:21-33

विलापगीत 3:21-33 - हे मी मनात आणतो म्हणून मला आशा आहे.
आम्ही भस्म झालो नाही ही परमेश्वराची दया होय, कारण त्याच्या करुणेस खंड पडत नाही.
ती रोज सकाळी नवी होते; तुझी सत्यता थोर आहे.
“परमेश्वर माझा वतनभाग आहे”, असे माझा जीव म्हणतो; म्हणून त्याच्या ठायी मी आशा ठेवीन.
जे परमेश्वराची आशा धरून राहतात त्यांना, जो जीव त्याला शरण जातो त्याला, परमेश्वर प्रसन्न होतो.
परमेश्वरापासून येणार्‍या तारणाची वाट पाहणे आणि तीही मुकाट्याने पाहणे बरे आहे.
मनुष्याने आपल्या तारुण्यात जू वाहावे हे त्याला बरे आहे.
त्याने एकान्ती बसावे व स्वस्थ असावे, कारण त्याने त्याच्यावर हे ओझे ठेवले आहे.
त्याने आपले तोंड मातीत खुपसावे, कदाचित अद्यापि आशा असेल.
मारत्या इसमाकडे त्याने आपला गाल करावा; त्याने उपहास सोसावा.
कारण प्रभू कायमचा त्याग करणार नाही;
तो जरी दु:ख देतो तरी तो आपल्या दयेच्या वैपुल्यानुसार करुणा करतो.
तो कोणास मुद्दाम पीडा करीत नाही, मानवपुत्रांना दु:ख देत नाही.

हे मी मनात आणतो म्हणून मला आशा आहे. आम्ही भस्म झालो नाही ही परमेश्वराची दया होय, कारण त्याच्या करुणेस खंड पडत नाही. ती रोज सकाळी नवी होते; तुझी सत्यता थोर आहे. “परमेश्वर माझा वतनभाग आहे”, असे माझा जीव म्हणतो; म्हणून त्याच्या ठायी मी आशा ठेवीन. जे परमेश्वराची आशा धरून राहतात त्यांना, जो जीव त्याला शरण जातो त्याला, परमेश्वर प्रसन्न होतो. परमेश्वरापासून येणार्‍या तारणाची वाट पाहणे आणि तीही मुकाट्याने पाहणे बरे आहे. मनुष्याने आपल्या तारुण्यात जू वाहावे हे त्याला बरे आहे. त्याने एकान्ती बसावे व स्वस्थ असावे, कारण त्याने त्याच्यावर हे ओझे ठेवले आहे. त्याने आपले तोंड मातीत खुपसावे, कदाचित अद्यापि आशा असेल. मारत्या इसमाकडे त्याने आपला गाल करावा; त्याने उपहास सोसावा. कारण प्रभू कायमचा त्याग करणार नाही; तो जरी दु:ख देतो तरी तो आपल्या दयेच्या वैपुल्यानुसार करुणा करतो. तो कोणास मुद्दाम पीडा करीत नाही, मानवपुत्रांना दु:ख देत नाही.

विलापगीत 3:21-33

विलापगीत 3:21-33