यिर्मया 31:3-5
परमेश्वराने दुरून येऊन मला दर्शन दिले; तो म्हणाला, मी सार्वकालिक प्रेमवृत्तीने तुझ्यावर प्रेम करीत आलो म्हणून मी तुला वात्सल्याने जवळ केले आहे. हे इस्राएलाच्या कुमारी, मी तुझी पुनर्घटना करीन आणि तुझी घटना होईल; तू पुन्हा आपल्या खंजिर्यांनी भूषित होशील व उत्सव करणार्यांबरोबर नृत्य करशील. शोमरोनाच्या डोंगरावर तू पुन्हा द्राक्षमळे लावशील; लावणारे लावतील व त्यांची फळे त्यांना लाभतील.
यिर्मया 31:3-5