YouVersion लोगो
सर्च आयकॉन

यशया 9:1-4

यशया 9:1-4 - तथापि आता ज्या भूमीत विपत्ती आहे तेथे हा अंधकार राहणार नाही. त्याने मागील काळात जबुलून प्रांत व नफताली प्रांत ह्यांची अप्रतिष्ठा केली तरी पुढील काळात समुद्रतीरीचा प्रदेश, यार्देनेच्या पलीकडील प्रांत, विदेशी लोकांचे मंडळ (गालील) ह्यांची तो प्रतिष्ठा करील.
अंधकारात चालणार्‍या लोकांनी मोठा प्रकाश पाहिला आहे; मृत्युच्छायेच्या प्रदेशात बसणार्‍यांवर प्रकाश पडला आहे.
तू राष्ट्राची वृद्धी केली आहेस; त्याला महानंदप्राप्ती करून दिली आहेस, हंगामाच्या उत्सवसमयी करायच्या आनंदाप्रमाणे, लूट वाटून घेणार्‍या लोकांच्या आनंदाप्रमाणे, ते तुझ्यासमोर आनंद करतात.
कारण मिद्यानाच्या दिवसाप्रमाणे, तू त्याच्या भाराचे जू, त्याच्या खांद्यावरची काठी, त्याच्यावर जुलूम करणार्‍याचा सोटा मोडला आहेस.

तथापि आता ज्या भूमीत विपत्ती आहे तेथे हा अंधकार राहणार नाही. त्याने मागील काळात जबुलून प्रांत व नफताली प्रांत ह्यांची अप्रतिष्ठा केली तरी पुढील काळात समुद्रतीरीचा प्रदेश, यार्देनेच्या पलीकडील प्रांत, विदेशी लोकांचे मंडळ (गालील) ह्यांची तो प्रतिष्ठा करील. अंधकारात चालणार्‍या लोकांनी मोठा प्रकाश पाहिला आहे; मृत्युच्छायेच्या प्रदेशात बसणार्‍यांवर प्रकाश पडला आहे. तू राष्ट्राची वृद्धी केली आहेस; त्याला महानंदप्राप्ती करून दिली आहेस, हंगामाच्या उत्सवसमयी करायच्या आनंदाप्रमाणे, लूट वाटून घेणार्‍या लोकांच्या आनंदाप्रमाणे, ते तुझ्यासमोर आनंद करतात. कारण मिद्यानाच्या दिवसाप्रमाणे, तू त्याच्या भाराचे जू, त्याच्या खांद्यावरची काठी, त्याच्यावर जुलूम करणार्‍याचा सोटा मोडला आहेस.

यशया 9:1-4

यशया 9:1-4