यशया 55:8-11
कारण माझ्या कल्पना तुमच्या कल्पना नाहीत; माझे मार्ग तुमचे मार्ग नाहीत, असे परमेश्वर म्हणतो. कारण आकाश जसे पृथ्वीहून उंच आहे, तसे माझे मार्ग तुमच्या मार्गांहून आणि माझ्या कल्पना तुमच्या कल्पनांहून उंच आहेत. पाहा, पाऊस व बर्फ आकाशातून पडतात; आणि पृथ्वी भिजवून, तिला सफळ व हिरवीगार केल्यावाचून, पेरणार्यास बीज, खाणार्यास भाकरी दिल्यावाचून ती परत वर जात नाहीत, त्याप्रमाणे माझ्या मुखातून निघणारे वचन होईल; ते माझी इच्छा पूर्ण केल्यावाचून व ज्या कार्यासाठी मी ते पाठवले ते केल्यावाचून माझ्याकडे विफल होऊन परत येणार नाही.
यशया 55:8-11